Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरूणाचा तिक्ष्ण हत्यारानं सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय 21, रा. पट्टीवडगाव) असं मृत युवकाचं नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वरचा एक साथीदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईक तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत.
नेमकी घटना काय?
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत ज्ञानेश्वर वाकडे हा गेल्या एक वर्षापासून लातूर जवळील हायवेवर एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. काल शनिवारी रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने त्याच्या स्वतःच्या मोटारसायकलवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही होते. ते घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता, तिथे त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. या वादविवादातून संशयित आरोपींनी तिक्ष्ण चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. Mumbai Traffic: मुंबईतील दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना वेग; शीव-पनवेल महामार्गावर कोंडी फुटणार; कसे असतील मार्ग?
एका मित्राने पळ काढला
ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी मोटारसायकलवर ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढल्यानं तो सुदैवाने बचावला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या मित्रास तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचंही सांगण्यात आलं आहे. Moshi Building Collapse : ‘पुढच्या वर्षी नक्की वारी करेल’; पण नियतीने आयुष्याला पूर्णविराम दिला, मोशी दुर्घटनेत अवघ्या 25 दिवसांच्या लेकराचं पितृछत्र हरपलं या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून अचानक मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानं नातेवाईकांत आणि कुटुंबावर जणू आघात झाला असल्याचं दिसून येत आहे. यावेळी मयत ज्ञानेश्वर वाकडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा