सावरकरांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात जनहित याचिका केल्या आहेत, असा दावा फडणीस यांनी केला.

फडणीस हे सावरकरांचे कुटुंबीय किंवा निकटवर्तीय नातेवाईक नसल्याने त्यांना या खटल्यात हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.
Pune Crime : ‘तू पोरींना काय बोलला’? ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये तरुणाला मारहाण, प्रकरणाचं सातारा कनेक्शन; पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटकन्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालविल्याबद्दल डॉ. फडणीस यांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, पुढील सुनावणीपूर्वी ही रक्कम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अभ्यासक डॉ. पंकज फडणीस यांनी या प्रकरणात पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर २५ वर्षे संशोधन केले असून, तीन पुस्तके लिहिली आहेत.
Pune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तनमात्र, तक्रारदार सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर आणि राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार या दोन्ही बाजूंनी अर्जाला विरोध केला. ‘ही वैयक्तिक मानहानीची तक्रार असून, तिसऱ्या व्यक्तीला यात हस्तक्षेप किंवा मध्यस्थी करण्याचा अधिकार नाही. अशा मध्यस्थीमुळे खटल्याची सुनावणी मूळ विषयापासून भरकटून विलंब होईल,’ असा युक्तिवाद सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केला; तर या खटल्यात अर्जदाराला मध्यस्थी करण्याचा कायदेशीर अधिकार नसून, निष्पक्ष सुनावणीच्या हक्काला बाधा पोहोचेल, असा दावा राहुल गांधींच्या वकिलांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरताना भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ मधील मृत व्यक्तीच्या मानहानीविषयीच्या तरतुदींचाही उल्लेख केला.
मृत व्यक्तीबाबत कथित बदनामी झाल्यास त्याचे कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक यांनाच संबंधित भावना दुखावल्याचा कायदेशीर दावा करता येतो, असे न्यायालयाने नमूद केले.

