Headlines

समविचारी पक्षांबरोबर युतीसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे खुले : खर्गे


पणजी : भाजपच्या भ्रष्ट आणि गोवाविरोधी कारभाराचा पराभव करण्यासाठी समविचारी राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्याचे काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, असे स्पष्ट करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल मंगळवारी स्पष्ट केले.

मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीला संबोधित करताना खर्गे म्हणाले, आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. हा जनतेचा कल आहे आणि जनहितासाठी त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. भाजपचा पराभव करून त्यांचे भ्रष्ट शासन संपवण्यासाठी समविचारी राजकीय पक्षांनी आघाडीत सहभागी व्हावे. राज्याचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत असतानाही धार्मिक तेढ निर्माण करून आणि समाजात फूट पाडून भाजप राजकीय लाभ मिळवत असल्याची भावना जनतेमध्ये आहे. यावेळी जनतेच्या इच्छेविऊद्ध भाजपला पुन्हा सत्ता बळकावू देणार नाही.

गोमंतकीय जनता भाजप सरकारच्या विरोधात विविध प्रश्नांवर संघर्ष करत असून, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी या जनआंदोलनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. राज्यात आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या जनतेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जमिनीचे व्यवहार आणि जमीन रूपांतरणातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवला जात आहे. हे असेच सुरू राहिले, तर गोमंतकीयांना स्वत:च्याच राज्यात जमिनीची आणि अस्तित्वाची किंमत उरणार नाही, असेही खर्गे म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत