Headlines

सचिन अडसूळ यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारीपदाची धुरा


सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोल्हापूर येथील सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकुंद चिलवंत यांनी १९ जुलै २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती प्रभावी प्रचार-प्रसिद्धीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत