संजय निंबाळकर यांनी २०१९ ला ओमराजेंसाठी प्रचार केला, २०२९ ला त्यांच्याविरोधात उभे ठाकणार? – dharashiv senior ncp leader sanjay nimbalkar join shiv sena ubt against omraje nimbalkar
संजय निंबाळकर यांनी २०१९ ला ओमराजेंसाठी प्रचार केला, २०२९ ला त्यांच्याविरोधात उभे ठाकणार? – dharashiv senior ncp leader sanjay nimbalkar join shiv sena ubt against omraje nimbalkar
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये जाऊन सभा घेतली आणि त्याचवेळी ओमराजेंना पर्याय देण्याचं आश्वासन धाराशिवच्या जनतेला दिलं… आणि आता दोन महिन्यातच उद्धव ठाकरेंनी तो शब्द खरा केला की काय असं म्हटलं जाऊ लागलंय. उद्धव ठाकरेंनी एक असा मास्टरस्ट्रोक खेळला आहे, ज्यामुळे धाराशिवच्या राजकारणातली गणितं बदलली आहेत. ठाकरेंनी थेट संजय निंबाळकर यांना पक्षात प्रवेश देऊन ओमराजे निंबाळकरांना मोठा पर्याय उभा केला आहे. नेमका काय आहे हा राजकीय गेमप्लॅन? संजय निंबाळकर नेमके कोण आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया