Headlines

श्रुती मराठेचा सिल्व्हर सिक्विन स्कर्टमधील क्लासी लूक चर्चेत, अमेरिकेत मराठीचा डंका – marathi actress shruti marathe nafa 2026 silver sequin skirt look


मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या हटके आणि स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. श्रुतीच्या सिल्व्हर सिक्विन स्कर्टमधील क्लासी लूकची चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचा हा अंदाज समोर आल्याने केवळ तिच्या फॅशनचीच नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी कलाकाराच्या उपस्थितीचीही चर्चा होत आहे.

Shruti Marathe silver sequin skirt look at NAFA 2026
फोटो सौजन्य :- @shrumarathe
मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री श्रुती मराठे हिने आपल्या अभिनयासोबतच फॅशनच्या बाबतीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कधी पारंपरिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळतो, तर कधी अगदी मॉडर्न आणि ग्लॅमरस लूकमधून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा श्रुतीचा असाच एक हटके अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. निमित्त आहे अमेरिकेतील NAFA Film Festival 2026चे. अमेरिकेत झालेल्या या सोहळ्यात श्रुती मराठेने आपल्या स्टायलिश अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे यावेळी तिचा लूक नेहमीच्या पारंपरिक साड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. सिल्व्हर सिक्विन स्कर्ट आणि ब्लॅक टॉपच्या कॉम्बिनेशनमध्ये श्रुतीने आपला लूक कॅरी केला. सिल्व्हर सिक्विनमुळे आउटफिटला झगमगाट मिळाला, तर ब्लॅक रंगाने या लूकला क्लासी आणि सॉफिस्टिकेटेड टच दिला. तिचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांचे लक्ष या नव्या लुककडे वेधले गेले आहे. (फोटो सौजन्य :- @shrumarathe)
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा