Headlines

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! धानाला हेक्टरी २५ हजार बोनस देणार, देवेंद्र फडणवीसांची ग्वाही – devendra fadnavis assurance will give bonus of 25k rupees per hectare to paddy farmers pri


Good News For Farmar: दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मांडली. त्याला फडणवीस यांनी बोनसची फाइल मंजूर केली जाईल, असा विश्वास दिला.

Devendra Fadnavis 2
Devendra Fadnavis 2(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. यासंबंधीची फाइल मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येत्या पाच वर्षांपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कृषिपंपाचे वीज बिल भरायचे नाही. उपसा सिंचन योजनेलासुद्धा आम्ही आधीच निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिरोडा येथे धापेवाडा योजनेच्या टप्पा-२ व ३सह इतर विकासकामांचे भूमिपूजन आणि दुरुस्ती झालेल्या वितरिकेचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहागंडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, हेमंत पटले यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या काळात विदर्भातील सिंचन प्रकल्पांना निधीच मिळत नव्हता. त्यामुळे सिंचनाचे प्रश्न आम्हाला सोडवि Maharashtra TimesChhagan Bhujbal: गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचीही जबाबदारी! बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेरण्याची संधी मिळाली. ‘लाडकी बहीण’ योजनेविरुद्ध काँग्रेसचे लोक न्यायालयात गेले. ही योजना फसवी असल्याचा कांगावा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ही योजना त्यांचे सरकार आल्यास बंद करू असे म्हणत आहेत. पण, लाडक्या बहिणी सोबत असलेले सरकार परत येणार आहे. त्यांचे हे स्वप्नच राहणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी, लाडक्या बहिणी, युवकांच्या हितासाठी भाजप काम करीत असल्याची ग्वाही दिली.
Maharashtra TimesBaba siddique Murder : ‘…तर फडणवीसांच्या हेतूंवर शंका’; सिद्दिकींच्या हत्येनंतर आव्हाडांच्या मुलीचं ट्विट व्हायरल
प्रास्तविकात आमदार विजय रहांगडाले यांनी केले. संचालन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. कार्यक्रमादरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी वीस हजारांचे बोनस दिले होते. यावर्षी पाच हजारांची वाढ करून २५ हजार करण्यात यावे, दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मांडली. त्याला फडणवीस यांनी बोनसची फाइल मंजूर केली जाईल, असा विश्वास दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा