Headlines

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध उपक्रमांचे आयोजन


आंबोली प्रतिनिधी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा तरुण तडफदार व झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी २२ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघासह सावंतवाडीत त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात शेतकऱ्यांना खत वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादृष्टीने शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका शिवसेना पदाधिकारी तसेच दिनेश गावडे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत