Headlines

शाहरुख खानच्या मन्नतमध्ये आला ८ फुटी साप; पावसाळ्यात तुमच्या घरी साप आल्यास सर्पमित्र वनिता बोराडेंनी सांगितले उपाय – rat snake at shahrukh khan residence in mumbai how to keep snakes away from your home


शाहरुख खानच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या आवारात नागपंचमीच्या दिवशी दोन साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पावसाळ्यात सापांचा वावर वाढणे ही सामान्य बाब आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे यांच्याशी संवाद साधला.

Snake In House During Monsoon
(फोटो सौजन्य :- @iStock,@iamsrk, @Vanita Jagdeo Borade, @dcn_mumbai)
मुंबईतील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या आवारात नागपंचमीच्या दिवशी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मन्नतच्या आवारात दोन साप दिसल्याची माहिती समोर आली. यातील एका सापाचा शोध घेण्यात आला, तर दुसरा साप पळून गेल्याचे सांगण्यात आले. मन्नतच्या अंगणातील जिन्याखाली एक साप वेटोळे घालून बसलेला आढळला. साप दिसताच सर्पमित्र विकी दुबे यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक दादा गायकवाड आणि ठाणे येथील मुंबई रेंज ऑफिसच्या नियंत्रण कक्षालाही याबाबत माहिती देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात साप घरात किंवा घराच्या परिसरात आल्यास नेमकी कोणती काळजी घ्यावी, सापांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करता येतात आणि साप दिसल्यानंतर नागरिकांनी काय करावे, याबाबत आम्ही वनिता बोराडे यांच्याशी संवाद साधला. वनिता बोराडे या सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, सर्परक्षक आणि सरीसृप शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सर्पसंवर्धन आणि जनजागृतीच्या कार्यामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे.(फोटो सौजन्य :- @iStock)

घरात साप आल्यास काय करावे?

घरात साप आल्यास काय करावे?

सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे यांच्या मार्गदर्शनानुसार, घरात साप आढळल्यास सर्वात आधी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे. सापाला पकडण्याचा, मारण्याचा किंवा काठीने हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. साप दिसलेल्या खोलीत लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यांना तात्काळ दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवावे. साप कोणत्या दिशेने गेला हे लक्षात ठेवणे सर्पमित्राला त्याचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते.घरात साप शिरल्यास शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून त्याच्यावर लक्ष ठेवावे. मात्र, त्याच्या अगदी जवळ जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नये. सापाला कोपऱ्यात कोंडण्याऐवजी त्याला मोकळी जागा देणे अधिक सुरक्षित ठरते.

पावसाळ्यात घरात साप

घरात साप आल्यास काय करावे?

घरात साप आल्यास काय करावे?

सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे यांच्या मार्गदर्शनानुसार, घरात साप आढळल्यास सर्वात आधी घाबरून न जाता स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे. सापाला पकडण्याचा, मारण्याचा किंवा काठीने हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. साप दिसलेल्या खोलीत लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यांना तात्काळ दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवावे. साप कोणत्या दिशेने गेला हे लक्षात ठेवणे सर्पमित्राला त्याचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरू शकते.घरात साप शिरल्यास शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून त्याच्यावर लक्ष ठेवावे. मात्र, त्याच्या अगदी जवळ जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नये. सापाला कोपऱ्यात कोंडण्याऐवजी त्याला मोकळी जागा देणे अधिक सुरक्षित ठरते.

पावसाळ्यात घराजवळ साप का येतात?

पावसाळ्यात घराजवळ साप का येतात?

पावसाळ्यात साप घरांच्या परिसरात आढळण्याच्या घटना वाढताना दिसतात. मुसळधार पाऊस, पाणी साचणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होणे यामुळे साप सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात मानवी वस्तीजवळ येऊ शकतात. घराभोवती झुडपे, लाकडाचा किंवा दगडांचा ढिगारा, कचरा तसेच उंदरांचा वावर असल्यास सापांना अशा ठिकाणी आसरा मिळू शकतो.विशेषतः जमिनीवरची घरे, बाग असलेले बंगले, गोडाऊन किंवा मोकळ्या जागेला लागून असलेली घरे याठिकाणी पावसाळ्यात अधिक काळजी घेणे आवश्यक असते. मात्र, घराजवळ साप दिसला म्हणजे तो हल्ला करणारच असे नाही. बहुतांश वेळा सापाला स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित मार्ग हवा असतो.

साप दिसल्यावर ‘हे’ करू नका

साप दिसल्यावर ‘हे’ करू नका

साप दिसला की अनेकजण घाबरून त्याच्यावर दगड फेकतात किंवा काठीने मारण्याचा प्रयत्न करतात. ही कृती धोकादायक ठरू शकते. सापाला धोका जाणवल्यास तो स्वतःच्या बचावासाठी चावू शकतो.तसेच इंटरनेट किंवा सोशल मीडियावर सांगितले जाणारे विविध घरगुती उपाय करून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे टाळावे. कोणतेही रसायन, धूर किंवा ज्वलनशील पदार्थ वापरून सापाला हुसकावणे धोकादायक आहे. अशा उपायांमुळे साप अधिक अस्वस्थ होऊ शकतो आणि घरातील व्यक्तींनाही धोका निर्माण होऊ शकतो.

घर सापांपासून सुरक्षित कसे ठेवावे?

घर सापांपासून सुरक्षित कसे ठेवावे?

पावसाळ्यात घराभोवती स्वच्छता ठेवणे हा सापांचा वावर कमी करण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. घराच्या परिसरातील गवत आणि अनावश्यक झुडपे वेळोवेळी काढावीत. लाकूड, विटा, दगड किंवा बांधकामाचे साहित्य दीर्घकाळ एका ठिकाणी साठवून ठेवू नये. घराच्या भिंतींना किंवा दरवाज्यांना मोठ्या फटी असतील तर त्या योग्य पद्धतीने बंद कराव्यात. खिडक्या आणि दरवाजांना शक्य असल्यास जाळी लावावी. घरात उंदरांचा त्रास असल्यास त्यावर योग्य उपाय करणेही महत्त्वाचे आहे, कारण उंदीर हे अनेक सापांचे भक्ष्य असतात.रात्री घराच्या बाहेरील परिसरात जाताना टॉर्चचा वापर करावा. विशेषतः पावसाळ्यात गवत, दगडांचे ढिगारे किंवा अंधाऱ्या जागेत हात घालणे टाळावे.

सापांबाबत जागरूकता

सापांबाबत जागरूकता

विशेष म्हणजे ही घटना नागपंचमीच्या दिवशी घडल्याने तिची चर्चा अधिक रंगली. नागपंचमीच्या निमित्ताने साप आणि नागांविषयी धार्मिक श्रद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र, सणाच्या काळात सापांशी संबंधित अंधश्रद्धा किंवा धोकादायक प्रथा टाळणेही तितकेच आवश्यक आहे.साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून उंदीर आणि इतर प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यात त्याची भूमिका असते. त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित वन विभागाची मदत घेणे हा सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे.

वनिता जगदेव बोराडे कोण आहेत?

वनिता जगदेव बोराडे कोण आहेत?

साप म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, याच सापांना आपले मित्र मानून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या वनिता जगदेव बोराडे यांनी महाराष्ट्रासह देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वन्यजीव संवर्धन, सर्पसंवर्धन आणि जनजागृतीच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘नारी शक्ती पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित केले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा