Headlines

शाळा-रुग्णालयांच्या अधिकृत बायोमेट्रिक मशीनचा गैरवापर:बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, 4 जण अटकेत




कांदिवली, वडाळा, मिरा-भायंदर आणि समतानगर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणे, बँक पॉलिसीची बनावट कागदपत्रे आणि बोगस शासकीय प्रमाणपत्रे बनवणाऱ्या अट्टल रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अन्वर शेख (रा. मिरा-भायंदर), अमित ऊर्फ सोनू शर्मा (रा. कांदिवली-पोयसर), विकास उतेकर (रा. वडाळा) आणि राजेश गुप्ता (रा. समतानगर, कांदिवली) या चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून अधिकृत आधार अपडेट मशीन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, 50 हून अधिक बनावट दस्तावेज, विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचे बनावट रबरी शिक्के आणि बनावट थंब इम्प्रेशनचे (अंगठ्याचे) शिक्के जप्त करण्यात आले आहेत. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवून दिले जात आहे का, या अंगाने पोलिस सध्या सखोल तपास करत आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त गजानन राजमाने म्हणाले, बनावट शासकीय व बँकेचे दस्तऐवज बनवणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून आधार मशीन, संगणक आणि बनावट शिक्यांसह थंब इम्प्रेशनचे शिक्के जप्त केले आहेत. या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी किंवा इतर बेकायदेशीर कामांसाठी गैरवापर होऊ नये, यादृष्टीने तपास सुरू आहे.
तपासात उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे जप्त बायोमेट्रिक मशीन ही अधिकृत नोंदणीकृत आहे. शाळा किंवा रुग्णालयाच्या नावे मंजूर मशीनचा वापर खाजगी जागेत बेकायदेशीरपणे सुरू होता. आरोपींनी विविध शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर करून शाळा सोडल्याचे बनावट दाखले (एलसी) तयार केले आणि आधार डेटाबेसमध्ये नवीन नोंदी व बदल केले. सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, आधार अपडेट प्रक्रियेतील ‘ऑपरेटर पडताळणी’ यंत्रणेला चकवा देऊन हे रॅकेट चालवले जात होते. नागरिकांवरही होणार गुन्हे दाखल नागरिकांनी अशा बेकायदेशीर केंद्रांकडे जाऊ नये; केवळ अधिकृत मार्गानेच कागदपत्रे बनवावीत. बनावट कागदपत्रे बनवून घेणाऱ्या नागरिकांवरही पोलिस गुन्हे दाखल करून कडक कारवाई करतील, असा इशारा पोलिस उपायुक्त राजमाने यांनी दिला. सरकारी मशीनचा असा झाला गैरवापर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत