Headlines

शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा! 298 गावांमध्ये सर्वेक्षण होणार; 40 तालुक्यातील 409 गावांना जोडणार| Maharashtra Times


Shaktipeeth Expressway Route: अनेक गावांमध्ये विरोध होत असतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे MSRDCसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

शक्तीपीठ महामार्ग अंतिम अधिसूचना
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून 9 जून रोजी अंतिम अधिसूचना जारी केली. त्यामुळे MSRDC आता 409 गावांपैकी काम बाकी असलेल्या 298 गावांमध्ये सर्वेक्षण सुरु करू शकणार आहे. हे पूर्ण होताच प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.

किती काम शिल्लक?

विदर्भापासून गोव्यापर्यंत राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त प्रकल्पाचा आराखडा ठरला असून ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालं होतं. पण या मार्गाला अनेक जिल्ह्यांमधून विरोध केला जात आहे. कोल्हापुरात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी या महामार्गाची तुलना समृद्धी महामार्गाशी केली. “एकदा भूसंपादन सुरू झालं, भूसंपदानाचे आणि नुकसान भरपाईचे दर जाहीर झाले के एका आठवड्यात लोक स्वत:हून पुढे येतील. त्यामुळे प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesPune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?

कसा आहे मार्ग?

वर्धा जिल्ह्यातीस दिगराजपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावापर्यंत 13 जिल्हे, 40 तालुके आणि 409 गावांमधून शक्तीपीठ महामार्गाचं बांधकाम होणार आहे. सध्या या प्रक्लापाचा अंदाजित खर्च 1.01 लाख रुपये आहे. नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येण्याची शक्यता आहे. नव्या आराखड्यानुसार वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे.

दरम्यान या महामार्गासाठी अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडून विरोध सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे संचालक गिरीश फोंडे यांनी या अधिसुचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत 30 जूनपर्यंत असल्याचे सांगितले. “तीव्र विरोधानंतरही शेतकऱ्यांवर हा प्रकल्प लादला जात आहे. या मार्गाची कोणतीही गरज नसून केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणि भ्रष्टाचाराला चालना देण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. सर्व शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.

Maharashtra TimesNorth Coastal Road: दक्षिण मुंबई ते भाईंदर सिग्नलमुक्त प्रवास! सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याला गती; कधी पूर्ण होणार?

सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राजपत्रात ही अंतिम अधिसूचना जारी केली. यामध्ये महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955च्या तरतुदीनुसार माहमार्गाचं बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन व प्रचालनासाठी आपला मानस जाहीर केला. या अधिसूचनेनुसार MSRDC राज्य सरकारला प्रकल्पासाठी ठरवलेली जमीन संपदित करण्याची विनंती करत असून या जमिनीचा वापर केवळ सार्वजनिक बांदकामासाठी केला जाईल असं नमूद केलं आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा