Coach Rajendra Devrukhkar News : मुंबईतील विलेपार्ले येथे गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर व्यायामशाळेत बोलावत अत्याचार केला आहे. व्हाट्सअपला मेसेज करत बोलावून घेतलं, मुलगी घाबरलेली पण पीटी टीचरमुळे सर्व प्रकार समोर आला.

नेमकं प्रकरण काय?
मुंबईमधील विलेपार्लेमधील व्यायामशाळेत राजेंद्र देवरूखकर हा प्रशिक्षण देत आहे. २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्काने त्याला गौरवण्यात आलं होतं. मात्र राजेंद्रची नियत फिरली, पीडित मुलगी अभ्यासामुळे मल्लखांब सरावासाठी जात नव्हती. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षक राजेंद्र देवरूखकर याने तिला व्हाट्सअॅपवर ‘Hi’ मेजेस केला.
Imran Khan News : इम्रान खानसाठी गावसकर-कपिल देव यांच्यासह 21 माजी कर्णधार एकवटले; पाकिस्तानच्या पीएमना पाठवलं 3 मागण्यांचं पत्र, कारण काय?
पीडितेनेही सरांचा मेसेज आला आहे म्हणून रिप्लाय केला आणि याबाबद्दल आईच्याही कानावर घातलं. तु कुठे आहेस? जर फ्री असशील तर मला व्यायामशाळेत भेटायला ये असं प्रशिक्षक राजेंद्र देवरूखकर म्हणाला. पीडित सकाळी वाजताच्या सुमारास व्यायामशाळेत सरांना भेटायला गेली. तिने विचारही केला नव्हता की ती ज्यांना भेटायला जाते आहे तो सर नाहीतर नराधम होता. शूज काढल्यावर पीडितेला ते आतमध्ये ठेव असे सांगितले. यादरम्यान त्याने दाराची कडी लावली आणि जबरदस्ती करू लागला. सुरूवातीला त्याने पीडितेची विचारपूस केली. त्यानंतर जबरदस्तीने तिलाा मिठी मारून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती तिथून निघून जात होती.
Ravindra Jadeja : नेमका काय विषय झाला! बॉल लागल्यावरही मैदान न सोडता खेळणारा रविंद्र जडेजा असा कसा आऊट झाला? Video व्हायरल
पीडित नकार देत असल्याने त्याने शेवटी जाता-जाता तिला आज जे झालं ते आपल्यातच राहुदे, असं म्हटल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या सर्व प्रकाराने ती घाबरून गेली होती, घरी आल्यावर ती काहीच बोलली नाही. कॉलेमध्ये गेल्यावर तिने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने विश्वासात घेतल्यावर त्या पीटीच्या सरांकडे गेल्या. त्यानंतर पीटी सरांच्या मदतीने अल्पवयीन पीडितेने विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
Imran Khan News : इम्रान खानसाठी गावसकर-कपिल देव यांच्यासह 21 माजी कर्णधार एकवटले; पाकिस्तानच्या पीएमना पाठवलं 3 मागण्यांचं पत्र, कारण काय?
दरम्यान, गुरु-शिष्याचे नाते हे विश्वास, संस्कार आणि आदरावर आधारलेले पवित्र नाते असतं. या नात्याचा गैरफायदा घेणे, विश्वासघात करणे किंवा स्वार्थासाठी त्याचा वापर करणे ही अत्यंत चुकीचं आहे. आई-वडिलांंनंतर सर्वा जास्त विश्वास हा गुरूवर असतो. पण अशा कृत्यांमुळे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर समाजातील या पवित्र नात्याच्या मूल्यांचेही नुकसान होते.

