Headlines

वैभवनं मैदान गाजवलं! 36 वर्षांपासून अबाधित असलेला रेकॉर्ड 8 धावांनी वाचला, पण 57 वर्षे जुना रेकॉर्ड मोडत इतिहास रचलाच, नेमका कोणता?


Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy News : वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ८१ चेंडूंत ९२ धावांची तुफानी खेळी केली. एका मोठ्या विक्रमापासून तो थोडक्यात दूर राहिला, मात्र ५७ वर्षे जुना विक्रम मोडत इतिहास रचला.

Vaibhav sooryavanshi fifty in duleep trophy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्य फेरीत ईस्ट झोनकडून खेळणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सेंट्रल झोनविरुद्धच्या या सामन्यात त्याने अचूक ‘डीआरएस’ घेत आपली मैदानावरील चुणूक तर दाखवलीच, पण बॅटनेही धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

सचिन तेंडुलकरचा विक्रम थोडक्यात हुकला

या सामन्यात वैभवने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ८१ चेंडूंत ९२ धावांची शानदार खेळी केली. या तुफानी खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ११४ चा होता. पण, दुर्दैवाने तो केवळ ८ धावांमुळे आपल्या शतकापासून मुकला. जर त्याने हे शतक पूर्ण केले असते, तर तो दुलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला असता. सध्या हा मोठा विक्रम ‘मास्टर ब्लास्टर‘ सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १९९०-९१ मध्ये १७ वर्षे आणि २६२ दिवस वयाचा असताना हे शतक झळकावले होते.

५७ वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त

दरम्यान, शतक हुकले असले, तरी वैभवने या सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम नक्कीच आपल्या नावे केला आहे. त्याने अवघ्या ४२ चेंडूंत आपले खणखणीत अर्धशतक पूर्ण केले.

Maharashtra TimesIND W vs THAI W : शेफाली वर्माच्या अर्धशतकानंतर भारताची घसरगुंडी, थायलंडला दिलं १६० धावांचं आव्हान

सर्वात युवा अर्धशतकवीर

वैभव आता दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू (१५ वर्षे आणि १५७ दिवस) बनला आहे. लक्ष्मण सिंग यांना टाकले मागे: याआधी हा विक्रम लक्ष्मण सिंग यांच्या नावावर होता. त्यांनी १९६९ मध्ये १६ वर्षे आणि २३ दिवस वयाचे असताना हा विक्रम केला होता. वैभवने त्यांचा हा ५७ वर्षे जुना विक्रम अखेर मोडीत काढला आहे.

फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीर कोण?

प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार केल्यास, भारताकडून सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम पंजाबच्या ध्रुव पांडव यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८८-८९ च्या रणजी हंगामात अवघ्या १४ वर्षे आणि २९३ दिवस वयात शतक ठोकले होते. जर वैभवने या सामन्यात शतक केले असते, तर तो भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात दुसरा सर्वात युवा शतकवीर ठरला असता.

Maharashtra TimesIND W vs THAI W : भारताला सुरुवातीलाच धक्का; सीमेवरून थायलंडच्या खेळाडूचा अफलातून थ्रो, स्मृती मानधना आऊट

संधी अजूनही संपलेली नाही

वैभव सूर्यवंशीचे वय सध्या केवळ १५ वर्षे आणि १५७ दिवस आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा दुलीप ट्रॉफीतील (१७ वर्षे, २६२ दिवस) सर्वात युवा शतकवीराचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे अजूनही खूप वेळ आहे. याच सामन्याच्या दुसऱ्या डावात, संघ अंतिम फेरीत गेल्यास तिथे किंवा पुढच्या हंगामातही तो हा ऐतिहासिक रेकॉर्ड नक्कीच मोडू शकतो.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा