Sunil Gavaskar News : भारतीय संघाचा आयर्लंड संघाने पराभव करत २-० ने मालिका खिशात घातली. दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी याला खेळवलं गेलं नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना सुनील गावसकर यांनी वैभवला का खेळवायला हवं होतं हे सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाला रविवारी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम टी-२० क्रिकेट लढतीत एका धावेने पराभव पत्करावा लागला. यासह टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची मालिका ०-२ने गमावली. कुठल्याही प्रकारातील आयलँडचा हा भारताविरुद्ध पहिलाच मालिकाविजय ठरला. या पराभवादरम्यान माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठे विधान केले आहे.
मला अपेक्षा होती की वैभव आयर्लंड मालिकेत पदार्पण करेल. मला विश्वास होता की तो दोन्ही सामने खेळेल. पुढील कठीण आव्हानांपूर्वी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सवय लावण्यासाठी ही उत्तम संधी होती. आयर्लंडमध्ये नाही, तर इंग्लंड मालिकेत त्याला संधी नक्कीच मिळेल. तो असा खेळाडू आहेत ज्यांच्याकडे तुम्ही फार काळ दुर्लक्ष करू शकत नसल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. IND W vs AUS W : याला म्हणतात कॅप्टन! हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियाला दणका, 25 चेंडूत फिफ्टी ठोकत महिला टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच… आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५४ धावा केल्या होत्या. हॅरी टॅक्टरने ४७ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याला बेन कॅलित्झची चांगली साथ मिळाली. तळातील जॉर्ज डॉक्रेलने एक चौकार व एक षटकारासह १९ धावांची भर घातली. त्यामुळे आयर्लंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. IND W vs AUS W : वर्ल्ड कपमधून भारताचं पॅकअप, नक्की कुठे चुकलं? कॅप्टन हरमनप्रीत कौरचे मोठे विधान; हे खूप दिवसांपासून सुरू… यानंतर मूळचा राजस्थानचा आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या वेगवान गोलंदाज जय मुंद्राने पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला माघारी पाठवले. यानंतर चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माही बाद झाला. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाल्याने भारताची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर मुंद्राने कर्णधार श्रेयस अय्यरचाही त्रिफळा उडवला. पाचव्या षटकात ईशान किशन धावबाद झाला. आघाडीचे चारही आक्रमक फलंदाज अवघ्या ३५ धावांत माघारी परतल्यानंतर भारतीय फलंदाज दबावात आले. IND vs IRE : अतिआत्मविश्वास नडला! आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला हरवलं, 2-0 ने जिंकली मालिका तिलक वर्माने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अक्षर पटेल आणि शिवम दुबेची फारशी साथ लाभली नाही. अर्धशतकानंतर तिलकही बाद झाल्याने भारतीय संघ लढत सहज गमावणार, असे वाटत होते. मात्र, हर्षित राणाने १० चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह २१ धावा केल्या. अखेरच्या दोन चेंडूंत आठ धावांची गरज असताना राणा बाद झाला. प्रिन्स यादवने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला खरा; पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही. श्रेयस अय्यर कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सलग दोन टी-२० लढती गमावणारा ऋषभ पंतनंतरचा दुसराच भारतीय कर्णधार ठरला.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा