Ind VS ENG Second T-20 Toss Update : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियात पदार्पण केले आहे. यासह तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वैभवची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ज्याची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या पदार्पणासह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात वैभवला संधी मिळणार का, याची उत्सुकता होती. अखेर टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि वैभवने भारताची निळी जर्सी परिधान करत मैदानात पाऊल ठेवले. या सामन्यात भारताने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सचिनचाही विक्रम मागे
वैभव सूर्यवंशी आता भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. अवघ्या 15 व्या वर्षी पदार्पण करत वैभवने तो विक्रम मागे टाकला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात केली.
आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने सर्वांचे लक्ष वेधले होते. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने 16 सामन्यांत 776 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले होते. ते आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज होण्याचाही मान त्याने मिळवला. आता आयपीएलनंतर वैभवने टीम इंडियासाठीही ऐतिहासिक पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा