Headlines

वैभव आता सोडत नसतो! WC फायनलमध्ये 175 धावांची तुफानी खेळी, झिम्बाब्वेला भिडण्याआधी सूर्यवंशीने सांगून टाकलंय, म्हणाला…


Vaibhav Sooryavanshi News : भारताचा उद्या म्हणजेच गुरूवारी झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेमध्ये वैभव राडा घालणार असे दिसत आहे. नेमका का ते जाणून घ्या.

Vaibhav Sooyavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिला सामना उद्या म्हणजेच २३ जुलैला पार पडणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे एकाच मैदानावर म्हणजेच हरारेवर होणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच टीमची घोषणा केली आहे. संजू सॅमसन याची या मासिकेसाठी निवड केली गेली नाही. त्यामुळे आता तिन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे सलामीला येतील. पण तुम्हाला माहिती का याच मैदानावर वैभवने १७५ धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. वैभव काय म्हणाला जाणून घ्या.

अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलचा सामना याच म्हणजे हरारे मैदानावर पार पडला होता. भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावा काढल्या होत्या, यामध्ये त्याने १५ चौकार आणि १५ षटकार मारले होते. या वादळी खेळीमुळे संपूर्ण सामना भारताच्या बाजूने आला होता. मात्र आता झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत पदार्पण केल्यावर त्याला मोठी खेळी करता आली नाही. सुरूवात मोठ्या फटक्यांनी करायचा मात्र त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. जोफ्रा आर्चर याने दोनवेळा आऊट करत माघारी पाठवले होते. त्यामुळे शेवटच्या सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आता प्लेइंग११ मध्ये त्याचे स्थान निश्चित आहे, कामगिरी कशी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM : ‘मीपण पहिल्या बॉलपासून फोडू शकतो’; तिलक वर्माने सांगितलं स्लो खेळण्याचं कारण, मॅनेजमेंटचं नाव घेत काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?

हे मैदान माझ्यासाठी कायम आठवणीत राहणार आहे. कारण या मैदानावरच आम्ही चार महिन्यांआधी अंडर १९ वर्ल्ड कपची फायनल खेळलो होतो आणि जिंकलोही होतो. भारतासाठी खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, खास करून अशा मैदानावर खेळायचं आहे जिथे चार महिन्यांआधी आम्ही इतिहास रचला होता. त्यामुळे या मालिकेत खेळताना नैसर्गिक खेळ करून मी आनंद घेण्याचा प्रयत्न करेल, असं वैभव सूर्यवंशी म्हणाला.
Maharashtra TimesIndia vs Zimbabwe 1st T20I : वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार; भारत-झिम्बाब्वे सामना लाइव्ह कुठे पाहायचा?
दरम्यान, मी या मैदानावर दोन सामने खेळलो असून त्या दोन्ही सामन्यांमध्ये मी चांगली कामगिरी केली होती. मला जसा सराव होता तो मिळाल्याने मी आनंदी आहे असून आत्मविश्वास वाढला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये मी अनेक चढ-उतार पाहिले पण क्रिकेट हा खेळच असा आहे की जिथे आयुष्यभर असंच चालणार यासाठी मला फक्त प्रोसेसला फॉलो करणार असल्याचंही वैभवने म्हटलं आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा