Headlines

विद्यार्थीच राष्ट्रभवितव्याचे शिल्पकार


स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांचा संदेश, युवकांचे सुरक्षित भवितव्य हेच केंद्र सरकारचे ध्येय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

विद्यार्थी हेच भारताच्या भवितव्याचे शिल्पकार असून त्यांच्या आणि युवकांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाच्या परीक्षा पद्धतीत अमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक परिणामकारक पावले उचलली आहेत. प्रश्नपत्रिकाफुटीसारखे प्रकार देशात कधीच घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि युवकांचे भवितव्य उज्ज्वल असावे, यासाठी सर्वांनीच दक्ष राहणे आवश्यक आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारची या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली.

आपल्या भाषणात त्यांनी प्रामुख्याने विद्यार्थी, युवक, परीक्षापद्धती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, राष्ट्रीय सुरक्षा, देशाची एकात्मता आणि अखंडता या विषयांवर भर दिला. सार्वजनिक परीक्षा हे युवकांना संधी मिळण्यासाठीचे एक महाद्वार आहे. या परीक्षा सुयोग्य पद्धतीने आणि भ्रष्टाचारमुक्त रितीने होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत काटेकोर आणि प्रभावी उपाययोजना केली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात पूर्ण निर्धार केला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

युवकांकडून रोजगार निर्मिती

सध्याच्या काळातील युवक हा कल्पक आणि उद्योजक मानसिकतेचा आहे. तो आपल्या सृजनशीलतेतून नवे रोजगार निर्माण करीत आहे. आता तो केवळ रोजगार इच्छुक राहिलेला नाही. तर तो रोजगार निर्माता होण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या या नवनिर्मिती क्षमतेचा प्रोत्साहन देणे आणि साहाय्य करणे हे सरकार आणि समाज या दोघांचेही कर्तव्य आहे, अशा अर्थाचा संदेश त्यांनी दिला आहे.

सुदृढ युवक, सुदृढ देश

शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ युवक हाच भारताच्या सुदृढ भवितव्याचा आधारस्तंभ आहे. ही बाब प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंब आणि समाज या दोन्ही घटकांनी युवकांच्या महत्वाकांक्षा फुलविण्यासाठी आणि या महत्वाकांक्षांना प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावयास हवे. हा भक्कम पाठिंबा विद्यार्थी आणि युवकांना मिळाल्यास ते कोणतेही आव्हान लीलया पेलू शकतील, अशा अर्थाची मांडणीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषणात केली आहे.

कारगिल आणि ‘सिंदूर अभियान’

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाषणात भर दिला. 1999 मधील कारगिल युद्ध आणि 2025 मधील ‘सिंदूर अभियान’ भारताच्या पराक्रमी सेनादलांनी यशस्वी केले. भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहणाऱ्या शत्रूंना या दोन्ही अभियानांच्या अंतर्गत चांगलाच धडा मिळाला. दहशतवादी आणि त्यांचे पोशिंदे यांना भारत कशा प्रकारे धाराशायी करतो, याचे प्रत्यंतर या दोन अभियानांमधून जगाला आले आहे, अशी भलावण त्यांनी त्यांच्या शनिवारच्या भाषणात केली.

आंतरराष्ट्रीय परिस्थती आव्हानात्मक

भारताचा विश्वास नियमबद्ध आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर आहे. अशी व्यवस्था अस्तित्वात येण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जगाच्या सर्व भागांमधील देशांना प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. भारताचे त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आज भारताचा मान जगात वाढला आहे. ‘ग्लोबल साऊथ’ ही संकल्पना भारताने प्रोत्साहित केली आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळातही आमची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे, असे उद्गार त्यांनी भाषणात काढले. त्यांनी या संदेशपर भाषणात विकसीत भारत, केंद्र सरकारच्या सामाजिक योजना, महिला सबलीकरण आणि आत्मनिर्भर भारत या योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

सुरक्षा, प्रगती, सुदृढ अर्थकारणावर भर

ड राष्ट्रपतींच्या संदेशपर भाषणात विद्यार्थी आणि युवकांच्या उज्ज्वलतेवर भर

ड युवकांच्या महत्वाकांक्षा फुलविणे हेच कुटुंब आणि समाजाचे प्रमुख कर्तव्य

ड परीक्षा पद्धती भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रभावी निर्णय

ड दहशतवाद संपविणे, देश नक्षलवादमुक्त करणे यांसाठी केंद्र आहे कटिबद्ध

ड सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक

ड केंद्र सरकारच्या विविध सामाजिक, आर्थिक योजनांमुळे गरीबांचा मोठा लाभ

ड आंतरराष्टˆrय क्षेत्रात भारताचा प्रभाव वर्धिष्णू, ग्लोबल साउथ तत्व यशस्वी

ड सर्वांच्या सहकार्याने देशाला प्रगतीपथावर नेणे, हेच केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत