Headlines

वाढवण बंदरासाठी आठपदरी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गला थेट जोडणार; खारफुटी तोडण्यासाठी हायकोर्टाची मंजुरी| Maharashtra Times


Vadhavan Port Mangroves: वाढवण बंदरासाठी खारफुटी बाधित होणार नसल्या तरी बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी 208 खारफुटी तोडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली आहे.

वाढवण बंदर महामार्ग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर: वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या बांधकामासाठी मुंबई हायकोर्टाने खारफुटीची झाडं तोडण्यास मंजुरी दिली आहे. बंदराला राष्ट्रीय महामार्ग-48ला जोडण्यासाठी महामार्गाची गरज असल्याचं हाय कोर्टाने नमूद केलं असून त्यामुळे 9.2498 हेक्टर खारफुटी वनक्षेत्र वळवण्यास आणि 208 खारफुटीची झाडं तोडण्यास NHAIला परवानगी दिली आहे.

महामार्ग नागरिकांसाठी महत्त्वाचा

पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराला महामार्गाशी जोडण्यासाठी आठ पदरी महामार्गा बांधण्यात येणार आहे. त्या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक पर्यावरणीय, किनारी नियमन क्षेत्र (CRZ) आणि वन विभागाच्या परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपिठाने दिली आहे. हा प्रकल्प जनहिताचा असून राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा असणाऱ्या वाढवण बंदराला महत्त्वाची कनेक्टिव्हीटी मिळण्यास मदत होणार आहे असं कोर्टाने नमूद केलं. वाढवण बंदरामुळे भारताचं नाव पहिल्या दहा कंटेनर बंदर असलेल्या देशांच्या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesBhayander-Ghodbunder Link: खाडीवर सहापदरी पूल, 5 किमी लांब जुळे बोगदे; भाईंदर ते घोडबंदर प्रकल्पांचा मार्ग मोकळा

कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल अॅक्शन ग्रुपचे ज्येष्ठ वकील आदित्य मेहता यांनी विरोध दर्शवला आहे. वाढवण बंदरासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवताना खारफुटीवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या मंजुरीवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. पण हाय कोर्टाने हा आक्षेप फेटाळला आहे. बाधित होणार्‍या खारफुटी ज्या क्षेत्रात आहेत ते बंदराच्या नाही तर रस्ते आणि रेल्वे विभागाच्या परिसरात येतात. बंदराचं बांधकाम करताना खारफुटी बाधित होणार नसून त्याला जोडणाऱ्या मार्गासाठी खारफुटी बाधित होतील असं निरिक्षण कोर्टानं केलं. हे दोन प्रकल्प वेगवेगळे आहेत असं स्पष्ट केलं.

NHAIनी भरपाई म्हणून वृक्षरोपणाच्या अटींची पूर्तता केल्याचंही कोर्टाने यावेळी नमूदकेलं. खारफुटीच्या संरक्षणासाठी तब्बल 4.83 कोटी रुपये दिले असून 30 हेक्टर जमीनीवर 1.33 लाख खारफुटीची झाडांची लागवड NHAIकरणार आहे. NHAIने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025मध्ये हाती घेतलेल्या संयुक्त क्षेत्रीय मोमापात प्रस्तावित रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या काही भागांमध्ये खारफुटींची वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे खारफुटी तोडण्याची गरज निर्माण झाली.

Maharashtra TimesMetro Line 14: कांजुरमार्ग-घणसोली-बदलापूर मेट्रोसाठी प्रतीक्षा वाढली, प्रकल्प अहवालात त्रुटी; MMRDA कोणत्या चुका सुधारणार?

वाढवणसाठी जमीन संपादन प्रक्रियेला वेग

वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन संपादन व मोबदला वितरण प्रक्रियेला गती मिळाली असून, डहाणू आणि पालघर तालुक्यातील नागरिकांनी स्वेच्छेने दिलेल्या जमिनीचा ताबा घेण्यास प्रशासनाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने (डीटीईपीए) मंजुरी दिली आहे. मात्र या क्षेत्रात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक व्यासाची झाडे कापण्यास मनाई करण्यात आली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा