Vadhvan Port Highway: वाढवण बंदराला थेट कनेकटीव्हीटी देण्यासाठी हा मार्ग उभारण्यात येत आहे. जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वाढवण येथे देशातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर: राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने वाढवण बंदराला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाचं कंत्राट कंपनीला दिले असून बांधकामाला लवकरच सुरूवात होईल. पालघर जिल्ह्यातील वरोर आणि तवा गावांना जोडणाऱ्या हा महामार्ग 72,790 झाडं, 21 तलाव आणि 209 विहीरिवरून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असल्याचं दिसून येतं आहे.
कसा असेल मार्ग?
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 48च्या जवळ वाढवण बंदराचा विकास होत आहे. बंदराला सहजपणे इतर मार्गांशी जोडण्यासाठी 2,360 कोटी खर्च करून हा मार्ग उभारण्यात येणार आहे. यामुळे दिल्ली-मुंबई द्रुतगती महमार्गाला एनएच-48शी थेट जोडणी मिळणार आहे. या मार्गावर 800 मीटर लांबीचे जुळे दुहेरी बोगदे उभारले जातील आणि 32.1 किमी लांब द्रुतगती महामार्ग असेल. या महामार्गावर दोन मोठे पूल, एक दुहेरी बोगदा, दोन इंटरजेड, 33 छोटे पूल, सहा उड्डाणपूल, जमिनीखालून पाणी जाण्यासाठी 84 कल्व्हर्ट, एक रेल्वे पूल आणि अनेक अंडरपास तयार केले जाणार आहेत. सध्या या महामार्गाची रचना चार पदरी असून भविष्यात ती आठ पदरी करण्याची योजना आहे.
पण या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अनेक झाडं व प्रकल्प बाधित होणार आहे. डहाणू आणि पालघरमधून हा मार्ग जाणार असून तेथील गावातील 573 घरं आणि बांधकाम प्रकल्प बाधित होणार आहेत. राज्य सरकार यासाठी 197 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. डहाणूमधील वाणगाव, घोळ. कोल्हाण, तवा,धामणते, कोलावली, वरोर, चिचंणी, बावडे आणि तनाशी गावांमधून जाणार आहे. डहाणीच्या तहसीलदार कार्यालयाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, या गावांमधील 244.18 हेक्टर जमीन बाधित होणार असून 5,214 नागरिकांना बांधकामाचा फटका बसणार आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी, शेतकरी, मच्छीमार रहिवासी राहतात. वाढवण बंदरामुळे आधीच अनेक नागरिकांना फटका बसणार असल्यामुळे त्याला विरोध केला जात आहे. त्यात आता नव्या महामार्गामुळे विरोधाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या वाढवण बंदराला दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अनावश्यक असल्याचे काही नागरिकांचे मत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा