भारतात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. ट्रायनुसार देशात मोबाइल कनेक्शन्सची संख्या 100 कोटीहून अधिक आहे, तर कोट्यावधी लोक स्मार्टफोन्सचा वापर करत आहेत. परंतु भारतात चालताना मोबाइलचा वापर केल्याने होणाऱ्या दुर्घटनांचा स्वतंत्र राष्ट्रीय डाटाबेस नाही, महानगरं, रेल्वे स्थानक, मेट्रो नेटवर्क आणि बाजारपेठांमध्ये ही समस्या वेगाने वाढत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
‘लेनिन’चा ट्रेलर प्रदर्शित अखिल अक्किनेनी मुख्य भूमिकेत
अखिल अक्किनेनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पतरणार असून त्याचा चित्रपट ‘लेनिन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात एका प्रेमकथेला गावाच्या हिंसक लढाईदरम्यान दाखविण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये अखिल साकारत असलेली लेनिन भूमिका आणि भाग्यश्री बोरसेची भूमिका भारती यांच्यातील रोमान्स दाखविण्यात आला आहे.
ट्ऱेलरमध्ये लढाईला ‘महाभारता’च्या कुरुक्षेत्राशी जोडण्यात आहे. तसेच यात ‘प्रेमापेक्षा मोठे युद्ध कुठलेच नसते’ असा संवाद आहे. या चित्रपटाची कथा मुरली किशोर अब्बूरू यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच पेले आहे. चित्रपटात ब्रह्माजी, ईश्वरी राव आणि सुनील देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाल थमन यांचे संगीत लाभले आहे.
लेनिन या चित्रपटाद्वारे अखिल 2023 नंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पूर्वी 26 जून रोजी प्रदर्शित केला जाणार होता, परंतु आता याच्या प्रदर्शनाकरता 10 जुलै तारीख निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटाची निर्मिती नागार्जुन आणि सूर्यदेवरा नागा वंसी यांनी केली आहे.
