Nashik Outer Ring Road: नाशिकच्या २५ गावांमधून जाणाऱ्या रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाला आहे. आतापर्यंत ५६ हेक्टर क्षेत्राची खरेदी पूर्ण झाली असून २० गावांमध्ये भूसंपादन ॲवॉर्ड जाहीर केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. प्रशासनाने आतापर्यंत २० गावांमधील सुमारे दीड हजार कोटींचे भूसंपादन अवॉर्ड जाहीर केले आहेत. सुमारे ५६ हेक्टर जमिनीची थेट खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सिंहस्थात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये याकरिता बाह्य रिंगरोड ची उभारणी करण्यात येणार आहे. नाशिक शहरालगतच्या २५ गावांमधून ६६.१५ किमी लांबीचा हा रिंगरोड असेल. यासाठी ३६५ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येते आहे. महसूल विभाग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळासाठी (एमएसआयडीसी) खासगी वाटाघाटींद्वारे भूसंपादन प्रक्रिया राबवित आहे. परंतु, यामध्ये अनेक अडचणी येत असून त्यावर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे ०.३० हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी नुकतेच पूर्ण करण्यात आली. एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या या जमिनीच्या व्यवहारासाठी संबंधित कुटुंबातील १९ सदस्यांनी उपस्थित राहून संमती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ३६२ कोटी ३४ लाखांचा मोबदला मालकांना अदा करण्यात आला. थेट खरेदीत बाजारभावापेक्षा २५ टक्के वाढीव मोबदला दिला जातो आहे.
रिंगरोड बाधितांना योग्य मोबदला
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता भूसंपादनाच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढू, अशी ग्वाही कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.२९) दिली.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाची महाजन यांच्यासमवेत बैठक झाली. बैठकीत रिंगरोड अलाइन्मेंट, भूसंपादनाचा मोबदला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. चुकीचे अलाइन्मेंट, अपुरा मोबदला, सुपीक जमिनींचे होणारे नुकसान; तसेच शहरी भूसंपादनाबाबतच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ज्या गावांच्या अलाइन्मेंटबाबत प्रश्न आहेत, त्या प्रत्येक गावातील प्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसवून चर्चेतून तोडगा काढला जाईल. कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची सरकार काळजी घेईल. गावनिहाय उच्चतम खरेदी-विक्री दराचा आधार घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य आणि योग्य मोबदला देण्याबाबत सरकार सकारात्मक असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल.
“आजची बैठक सकारात्मक झाली. महाजन यांनी शेतकयांच्या मागण्या गाभीयान ऐकल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. अंतिम निर्णय होईपर्यंत हा लढा संयमाने आणि एकजुटीने सुरू राहील. रिंगरोडबाधित शेतकऱ्यांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आहे,” असं शेतकरी प्रतिनिधी, करण गायकर म्हणाले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा