Headlines

रामदास आठवले आणि विशाल पाटलांमध्ये रंगली टोलेबाजी; सगळेच खळखळून हसले – laughter erupts as ramdas athawale and vishal patil trade jibes



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगलीमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत, त्यांना सगळ्या पक्षांनी मदत केली आहे, कोणी वरून, कोणी आतून, असा टोला मंत्री रामदास आठवलेंनी लगावला. तर विशाल पाटलांनी देखील महिला विधेयका दरम्यान संसदेत रामदास आठवले यांना बोलू दिले नाही, असे म्हणत फटकेबाजी केली. आठवले बोलले असते तर कदाचित त्यांनी आम्हाला समजून सांगितलं असतं, ज्यामुळे आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबु, अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली होती, असा खोचक टोला खासदार विशाल पाटलांनी रामदास आठवलेंना लगावला. सांगलीमध्ये मंत्री रामदास आठवले यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्या प्रसंगी ही टोलीबाजी रंगली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत