Headlines

राजस्थानच्या गोटात सर्वात मोठा ‘गेम’; वैभवसारखा हिरा पारखणारा ‘मास्टरमाइंड’ मुंबईने अलगद पळवला


Jubin Bharucha News : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांसारख्या तरुण भारतीय खेळाडूंना घडवणाऱ्या या स्टारची, मुंबई इंडियन्सने नवीन डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.

Jubin Bharucha
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलच्या रणसंग्रामात मैदानावरील खेळापेक्षा पडद्यामागच्या चाली अनेकदा जास्त घातक ठरतात. राजस्थान रॉयल्सच्या गोटात सध्या असाच एक मोठा ‘गेम’ झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वतः घडवलेले मॅचविनर्स दुसऱ्या संघांच्या हवाली करणाऱ्या राजस्थानने आयपीएल २०२७ च्या आधीच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. राजस्थानने आपला सर्वात मोठा ‘हुकुमाचा एक्का’ गमावला असून, मुंबई इंडियन्सने मात्र अंधाराचा फायदा घेत अचूक टायमिंग साधत मोठी लॉटरी लावली आहे.

पडद्यामागचा ‘मास्टरमाइंड’ हातातून निसटला

गेल्या चार-पाच वर्षांत राजस्थानने भारतीय क्रिकेटला एकाहून एक सरस हिरे दिले. पण हे हिरे शोधून काढण्यामागे एकाच ‘मास्टरमाइंड’चा मेंदू चालत होता, ते म्हणजे राजस्थानचे टॅलेंट स्काऊट आणि परफॉर्मन्स डायरेक्टर जुबिन भरुचा. यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंना हेरून त्यांना स्टार बनवण्याचं काम भरुचा यांनीच केलं होतं.

Maharashtra TimesAUS vs BAN : बांगलादेशच्या खेळाडूचा रडीचा डाव, कॅच पकडतानाच मध्येच आला, पण कांगारूंनी पुढच्या ओव्हरमध्ये जिरवली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानने एकतर भरुचा यांना डच्चू दिला आहे किंवा त्यांना आपल्या गोटात रोखून धरण्यात फ्रँचायझीला सपशेल अपयश आलं आहे. फ्रँचायझीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक मानली जात आहे.

वैभवला घडवणारा ‘कारीगर’

२०२५ मध्ये अवघ्या काही वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला ट्रायलसाठी बोलावून त्याच्यातील ‘स्पार्क’ जुबिन भरुचा यांनीच ओळखला होता. आज वैभव राजस्थानसाठी सर्वात मोठा ‘मॅचविनर’ ठरतोय, पण ज्या पारखी नजरेने हा हिरा शोधला, तो ‘कारीगर’च आता राजस्थानच्या तंबूतून बाहेर पडला आहे. जोस बटलर, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल यांसारखे स्टार्स गेल्यानंतर युवा टॅलेंट हाच राजस्थानचा आधार होता, पण आता नवे खेळाडू शोधणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra TimesZolani Tete death : ‘देशाने महान फायटर गमावला’; क्रीडा मंत्री भावुक, 38 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनचा धक्कादायक शेवट, काय घडलं?

मुंबई इंडियन्सचा ‘मास्टरस्ट्रोक’

एकीकडे राजस्थानने आपला सर्वात महत्त्वाचा मोहरा गमावला, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने क्षणाचाही विलंब न लावता जुबिन भरुचा यांना अलगद आपल्या जाळ्यात ओढले आहे. एका काळी मुंबईच्या याच स्काऊटिंग टीमने हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे सुपरस्टार शोधून काढले होते. गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे स्काऊटिंग कमकुवत झाले होते, पण आता भरुचा यांच्या ‘MI’ मधील एन्ट्रीमुळे मुंबई पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम युवा टॅलेंट आपल्या ताफ्यात खेचण्यासाठी सज्ज झाली आहे.

राजस्थानने जुबिन भरुचा यांना न रोखून भविष्यातील यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी गमावले आहेत. मुंबईने मात्र पडद्यामागे खेळलेली ही चाल आयपीएलच्या भविष्यातील समीकरणांची दिशा बदलणारी ठरू शकते.