दिवसातून तीनदा फोन चार्ज करून आणि सतत बॅटरी डाऊन होण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या ‘तक्रारदार’ मोबाईल युजर्ससाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य चार्जिंग पद्धती न वापरल्यामुळे फोनची बॅटरी वेगाने खराब होते. 20-80 चा सुवर्ण नियम आणि काही सोप्या सवयींचा वापर केल्यास वारंवार चार्जिंग करण्याची ही मोठी डोकेदुखी कायमची मिटू शकते.

1. 20-80 चा गोल्डन नियम वापरा
बहुतांश युजर्स फोनची बॅटरी पूर्ण 0 टक्के होईपर्यंत वापरतात आणि नंतर ती थेट 100 टक्क्यांर्यंत चार्ज करतात. पण लिथियम-आयन बॅटरीसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. बॅटरी पूर्ण रिकामी किंवा पूर्ण गच्च करणे तिच्यावर अतिरिक्त ताण आणते. त्यामुळे फोनची बॅटरी कधीही 20 टक्क्यांच्या कमी जाऊ देऊ नका आणि चार्जिंग करताना ती 80 टक्के ते 85 टक्क्यांच्या आसपास पोहचताच चार्जर बंद करा.
2. ‘ओव्हरहाइटिंग’ पासून फोनचा बचाव करा
उष्णता हा मोबाईलच्या बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा युजर्स गेम खेळताना किंवा हेवी व्हिडिओ पाहत असताना बॅटरी उतरू नये म्हणून फोन चार्जिंगला लावून ठेवतात. या पद्धतीला ‘पासथ्रू चार्जिंग’ म्हणतात. यामुळे फोनच्या अंतर्गत भागांचे तापमान प्रचंड वाढते और बॅटरी फुगण्याचा किंवा तिचा स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो. चार्जिंग करताना फोनचे कव्हर काढून ठेवणे आणि थेट सूर्यप्रकाशापासून फोन दूर ठेवणे बॅटरीच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
3. मूळ चार्जर आणि केबलचाच वापर करा
घरी किंवा ऑफिसमध्ये अनेकदा आपण समोर दिसेल त्या दुसऱ्या कोणत्याही ब्रँडच्या किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज करतो. प्रत्येक फोनची व्होल्टेज आणि अॅम्पीअर क्षमता वेगवेगळी असते. चुकीचा किंवा डुप्लिकेट चार्जर वापरल्याने फोनला अयोग्य वीजपुरवठा होतो, ज्यामुळे बॅटरीच्या अंतर्गत सेल्सचे कायमचे नुकसान होते. त्यामुळे नेहमी फोनसोबत आलेल्या मूळ (Original) चार्जरचा किंवा त्याच ब्रँडच्या प्रमाणित अॅक्सेसरीजचाच वापर करा.
4. रात्रभर चार्जिंग करण्याची चूक टाळा
सध्याच्या आधुनिक स्मार्टफोनमध्ये ‘ट्रिकल चार्जिंग’ किंवा बॅटरी पूर्ण झाल्यावर आपोआप वीजपुरवठा खंडित करणारे स्मार्ट कट्स असतात. तरीही, रात्रभर (7-8 तास) फोन चार्जरला जोडून ठेवल्याने बॅटरी सतत हाय-व्होल्टेज स्थितीमध्ये राहते. यामुळे बॅटरीचे लाईफ सायकल वेगाने कमी होते. शक्यतो दिवसा किंवा स्वतः समोर असतानाच फोन चार्ज करा.
5. बॅकग्राउंड अॅप्स आणि सिस्टीम फीचर्स नियंत्रित करा
फोनमध्ये स्क्रीनची ब्राइटनेस नेहमी ‘ऑटो-ब्राइटनेस’ मोडवर ठेवा किंवा ती गरजेनुसार कमी ठेवा. तसेच, ज्या अॅप्सचा आपण वापर करत नाही, ते बॅकग्राउंडमध्ये सुरू राहून गुपचूप बॅटरी शोषून घेत असतात. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘बॅटरी ऑप्टिमायझेशन’ सुरू करा आणि वाय-फाय, ब्लूटूथ किंवा लोकेशन (GPS) वापरात नसताना बंद ठेवण्याची सवय लावा. या लहान पण अत्यंत महत्त्वाच्या सवयींमुळे तुमच्या फोनची बॅटरी वारंवार डाऊन होणार नाही आणि तिची कार्यक्षमता वर्षानुवर्षे उत्तम राहील. (REF.)

