Headlines

मैत्रीच्या नात्याला भेटवस्तूंचा साज ;देखण्या भेटवस्तूंनी बाजारपेठ बहरली ,फ्रेंडशिप दिनानिमित्त बाजारात उत्साह


Friendship Day News: मैत्रीला वयाचे बंधन नसते अगदी हक्काच्या नात्याने जपलं जाणारा बंध म्हणजे मैत्री. म्हणूनच संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे हा ऑगस्टचा पहिला रविवार म्हणून साजरा होतो. आता ऑगस्ट महिन्यातल्या रविवारला कहीच दिवस बाकी असल्याने बाजारपेठा ह्या भेटवस्तूंनी भरलेल्या आहेत.

friendship day
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडिया, एआयच्या ट्रेंडमध्येही ‘फ्रेंडशिप डे’चे गारूड कायम आहे. बाजारात आकर्षक भेटवस्तू लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः व्यक्तिगत भेटवस्तूंवर भर असून पन्नास रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंना विशेष मागणी आहे.

सगळ्या पलिकचं एक नातं म्हणजे मैत्री

मैत्रीला वयाचे आणि इतर कोणत्याही गोष्टींचे बंधन नाही. ‘शेअर’ आणि ‘केअर’ या दोन तत्वांवर मैत्री सुरू होते. म्हणूनच संपूर्ण जगातच ‘फ्रेंडशिप डे’चे वेड आहे. ऑगस्टचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा होतो. मैत्रीचे नाते वय, जात, धर्म, गरीबी-श्रीमंतीच्या पलीकडचे. मित्र म्हणजे हक्काचे ठिकाण. या नात्याला ‘फ्रेंडशिप डे’ अजून जवळ आणतो.

गिफ्ट आणि बरचं काही

तरुणाईच नव्हे, तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात. मित्र-मैत्रिणी, स्नेह्यांना भेटवस्तू देण्यासाठी पावले ‘गिफ्ट गॅलरी’कडे वळत आहेत. केक शॉपमध्ये फॅन्सी केकच्या ऑर्डर सुरू झाल्या आहेत. यावर्षीही मराठी भेटकार्ड, पॉपकार्ड, मेसेज बॉटल, मॅजिक बॉक्स, कपल किचेन, मोमेंटो, फ्रेंडशिप बँड अशा बाबींवर जास्त भर आहे अशी माहिती ‘नयन क्रिएशन’चे दौलत नांगरे यांनी दिली.

Maharashtra TimesTukaram Mundhe: आपण भारतात आहोत, दोन किडे सापडले म्हणून हॉटेल बंद करणं चुकीचं; FDA च्या कारवाईवर कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

‘फ्रेंडशिप डे’ वस्तूंना मागणी

किचेन, फ्रेंडशिप बँड ५० रुपयांपासून उपलब्ध असून वुडन फ्रेमवर मोमेंटो, फोटोंच्या फ्रीज मॅग्नेटलाही खास मागणी आहे. यावर्षीही संग्रही ठेवण्यासारखे फ्रेंडशिप कार्डसोबत राशींवर आधारित ‘फ्रेंडशिप डे’ वस्तूंना मागणी आहे. कवयित्रींच्या सुंदर कवितांची भेटकार्डे आवर्जून घेतली जात आहेत. लहान मुलांच्या आवडीनुसार कार्टून कॅरेक्टर असलेले कीचेन आणि फ्रेंडशिप बेल्टचे देखणे प्रकार पहायला मिळतात.

Maharashtra TimesNagpur News: दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांसाठी जागा; पार्किंग पदपथसह वाहतूक कोंडीवर उपाययोजना

भेटवस्तूंचे विविध प्रकार उपलब्ध

‘कॅप्टन अमेरिका’, ‘थॉर’, ‘हल्क’, ‘आयर्न मॅन’, ‘ब्लॅक विडो’, ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘हॅरी पॉटर’सारख्या लोकप्रिय पात्रांचे किचेन लक्ष वेधत आहेत. थ्रेड आणि आर्टिफिशियल ज्वेलरीचे फ्रेंडशीप बॅन्डसह प्लॅस्टिक, रबर व रेऑन बॅन्ड उपलब्ध आहेत. मेटलचे फ्रेंडशिप बॅन्ड, मुलांसाठी लेदर बॅन्ड, मॅच बॉक्स लेटर विथ बॅन्ड, कीचेन विथ बॅन्डसह काचेच्या बाटलीत रंगबिरंगी कागदाच्या गुंडाळीवर लिहिलेला संदेश असे विविध प्रकार भेटवस्तूंमध्ये उपलब्ध आहेत.

” फ्रेंडशिप डे ची लोकप्रियता कायम असून यंदाही प्रत्येकाच्या बजेटनुसार गिफ्ट उपलब्ध आहेत.विशेष म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव असूनही अजूनही भेटकार्ड घेणारे ग्राहक आवर्जून भेटकार्ड निवडतात.”-दौलत नांगरे ,विक्रेते

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा