Headlines

मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा| Maharashtra Times


Western Railway: मुंबईत मेगा रेल्वे टर्मिनल उभारण्यासाठी सध्या पश्चिम रेल्वे प्रस्ताव तयार करत आहे. यासाठी कांदिवलीमध्ये जागा निश्चित करण्याता आली असून त्यावर नऊ प्लॅटफॉर्म असतील आणि ५४ मेल/एक्सप्रेस दाखल व रवाना होतील.

कांदिवली रेल्वे टर्मिनस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पश्चिम रेल्वे लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी महामुंबईतील सर्वात मोठं टर्मिनल उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी कांदिवलीची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज तब्बल ५४ मेल/एक्सप्रेसची वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाची जमिनीची आवश्यकता आहे.

कोणाला फायदा होणार?

सध्या पश्चिम रेल्वे यासाठी प्रस्ताव तयार करत आहे. हा प्रस्ताव तयार होताच पश्चिम रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेतली जाणार आहे. या नव्या टर्मिनलवरून दररोज सुमारे एल लाख नव्या प्रवाशांना सेवा मिळू शकते. मुंबईहून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा फायदा होता. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार आहे.

Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

मुंबईतील ८० टक्के लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून रवाना होतात. त्यामुळे या टर्मिनलवर ट्रेनची संख्या वाढवणं शक्य नाही. कांदिवली गुड्स यार्डजवळ १,१०० मीटर बाय ४०० मीटर भूखंडावर हे टर्मिनल प्रस्तावित आहे. या जमिनीवर नऊ प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि ट्रेनच्या देखभालीसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र ही जमीन सध्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे.

कांदीवली ते मालाडदरम्यान दुसरा भूखंड

फेब्रुवारी २०२५ रोजी या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने ती जमीन हास्तंरित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासमोर औपचारिक प्रस्ताव सादर केला. तसेच, कांदिवली आणि मालाडदरम्यान दुसऱ्या ७०० बाय ६०० मीटर भूखंडाची पाहणी करण्यात आली आहे. पण ही जमीन लहान असल्यामुळे प्रत्यक्ष टर्मिनसऐवजी पिट लाइनसारख्या इतर पायाभूत सुविधा उभारली जाणार आहे. कांदिवली कार शेड आणि पोईसर मेट्रो स्थानकालगतची ही जमीन असेल. ट्रेनच्या डब्यांची दुरूस्ती आणि सर्व गाड्या नियमितपणे तपासण्साठी दोन समर्पित ‘शंटिंग नेक’ही उभारले जाणार आहेत.

Maharashtra TimesPune News: पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार

प्रस्तावित टर्मिनलवर ९ प्लॅटफॉर्म असतील. प्रत्येक प्लॅटफॉर्म ६२५ मीटर लांब असतील व देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी सहा अतिरिक्त रेल्वे मार्गिका असतील. प्लॅटफॉर्म वरती ७५० मीटर प्रवासी डेक बांधला जाणार आहे. कांदिवली रेल्वे स्थानकापासूनही अगदी जवळ हे टर्मिनस असेल. याशिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांशीही जोडण्यात येणार आहे.

परंतु, या दोन्ही जागेंवरती संरक्षण मंत्रालयाची प्रशासकीय कार्यलये, कर्मचारी निवासस्थने आणि डेपो आहेत. त्यामुळे यापूर्वी दोन वेळा मंत्रालयाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. पण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते मुंबईमध्ये सध्या मेगा टर्मिनलची गरज आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाबाबत या विषायवर चर्चा सुरू आहेत.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा