Headlines

‘मीपण पहिल्या बॉलपासून फोडू शकतो’; तिलक वर्माने सांगितलं स्लो खेळण्याचं कारण, मॅनेजमेंटचं नाव घेत काय म्हणाला?


Tilak Varma News : भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यावर स्लो खेळण्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. पहिल्या बॉलपासूनही मोठे हिट मारण्याची क्षमता माझ्यात आहे असं सांगताना त्याने स्लो खेळण्याचं कारण सांगितलं आहे. ी

Tilak Varma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून म्हणजेच २३ जुलैला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याला धीम्या गतीने खेळण्यावरून त्याला प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना तिलकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी पहिल्या चेंडूपासून हिट मारू शकतो पण प्रत्येक सामन्यात गतीने धावा करण्याची आवश्यकता नसते, सामन्याच्या परस्थितीनुसार खेळत असल्याचं तिलक म्हणाला.

तिलक वर्मा काय म्हणाला?

टी-२० क्रिकेट सामन्यात प्रत्येकवेळी वेगळी परिस्थिती असते आणि त्यानुसार प्रत्येक फलंदाज जुळवून घेत खेळतो. आयर्लंड दौऱ्यामध्ये पॉवर प्ले किंवा पहिल्या १० ओव्हरमध्येच भारताच्या चार ते पाच विकेट जात होत्या. त्यामुळे संघ अडचणीत असताना वेगाने धावा करण्यासाठी धोका पत्करू शकत नाही. जर गरज असेल तर मी पहिल्या चेंडूपासूनच मोठे हिट खेळू शकतो, पण देशासाठी खेळताना तेही उपकर्णधारपदाची जबाबदारी असताना डाव सांभाळणं गरजेचं असतं. अशावेळी उगाच स्ट्राईक रेट वाढवण्याच्या नादात आऊट होणं हा चुकीचा निर्णय ठरू शकतो, असं तिलक वर्मा म्हणाला.
Maharashtra TimesR Ashwin : रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कोणी टचही करू शकत नाही; आर अश्विन असं का म्हणाला?
टीम मॅनेजमेंट ज्या भूमिकेसाठी मला पाठवतं त्याप्रमाणे मी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिलक वर्माने म्हटलं आहे. आता झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंडमधील मालिकेत झालेल्या सात टी-२० सामन्यात तिल वर्मा याने १७८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यामधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ५५ असून स्लो खेळल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. आता झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेमध्ये कशा प्रकारे खेळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra TimesIND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?
दरम्यान, श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने एकही टी-२० सामना जिंकलेला नाही. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने २-० ने तर इंग्लंडने ४-० ने मात करत भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे या मालिकेत तरी भारतीय संघ विजयाचा श्रीगणेशा करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Maharashtra TimesRohit Sharma : इंग्लंडला रोहित शर्मा फोडत होता, पण बॅट टीमबाहेर असलेल्या खेळाडूची होती; नेमकी कोणाची?

भारत वि. झिम्बाब्वे टी-२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० सामना- २३ जुलै, दुपारी ४.३० वाजता
  • दुसरा टी-२० सामना- २४ जुलै, दुपारी ४.३० वाजता
  • तिसरा टी-२० सामना- २५ जुलै, दुपारी ४.३० वाजता