टीव्हीच्या पडद्यावरून बंद झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत यूट्यूबवर पुनरागमन करणाऱ्या ‘ सावित्रीबाई जोतीराव फुले ‘ मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाच्या जोरावर आता आठवड्यातून सहा दिवस या मालिकेचे नवे भाग प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मराठीसह हिंदी भाषेतही ही मालिका देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
टीकीच्या प व्हीच्या पडद्यावरून अचानक बंद झालेली डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती आणि मुख्य भूमिका असलेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका आता डिजिटल माध्यमावर नवा इतिहास घडवत आहे. कमी टीआरपीचं कारण देत जूनच्या मध्यावर मालिका बंद करण्यात आली होती. मात्र, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य घराघरांत पोहोचवण्याचा निर्धार करत डॉ. कोल्हे यांनी मालिकेच्या टीव्हीवरील शेवटच्या एपिसोडनंतर अवघ्या सहा दिवसांत, म्हणजेच २० जूनपासून ही मालिका ‘मराठी वारसा’ या यूट्युब चॅनलवर पुन्हा सुरू केली. सध्या ही मालिका दर सोमवार, बुधवार आणि शनिवार संध्याकाळी प्रेक्षकांचा भेटीला येते. परंतु, प्रेक्षकांचा वाढत प्रतिसाद पाहता येत्या आठवड्यापासून मालिका सहा दिवस सहा नवे भाग प्रसारित होणार असल्याचं डॉ. कोल्हे यांनी ‘मुंटा’शी संवाद साधताना सांगितलं. तसंच मराठीसोबतच हिंदी भाषेतही मालिकेचे भाग उपलब्ध करण्यात आले असून देशभरातील प्रेक्षक या मालिकेशी जोडला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. कोल्हे यांनी ‘मराठी वारसा’सह आता ‘अनमोल भारत‘ या नव्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे. ‘मराठी वारसा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतिहास, महापुरुषांचे विचार आणि प्रेरणादायी कथा मराठीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तसाच सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे हा प्रवास संपूर्ण भारताच्या इतिहास, संस्कृती आणि वारशाला समर्पित अशा व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा संकल्प ‘अनमोल भारत’च्या माध्यमातून करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘या व्यासपीठावर भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्यासह विविध क्षेत्रांतील महान व्यक्तिमत्त्वांच्या कथा जागतिक दर्जाच्या सादरीकरणातून मांडल्या जाणार आहेत. इतिहास केवळ सांगायचा नाही, तर तो सिनेमॅटिक अनुभवातून जिवंत करायचा, अशी या उपक्रमामागील भूमिका आहे’, असं ते म्हणाले. नव्या उपक्रमाबाबत डॉ. अमोल म्हणाले, “मराठी वारसा’ सुरू केलं, तेव्हा आपल्या महापुरुषांचे विचार आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा आमचा ध्यास होता. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच ‘अनमोल भारत’चा जन्म झाला आहे. आमचा उद्देश कोणत्याही एकाच विचारधारेचा प्रचार करण्याचा नाही; तर इतिहासाकडे वस्तुनिष्ठ नजरेनं पाहण्याचा आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, तथ्यांच्या आधारे मांडणी आणि उच्च दर्जाच्या निर्मितीतून प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.’
शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात, अमोल कोल्हे आक्रमक, भाषणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट!
Manish Paul : साधं रुमचं भाडं भरायला नसायचे पैसे, मित्रांचा सल्ला घेतला मनावर अन् बदललं मनीष पॉलचं नशीब
कौतुक अजूनही दबक्या आवाजात !
‘ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. त्यामुळेच आता ही मालिका आठवड्यातील सहा दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या प्रयोगाबद्दल आणि मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक मंडळी वैयक्तिक स्वरूपात माझ्याशी संपर्क साधून कौतुक व्यक्त करत आहेत. मात्र, हे कौतुक अजूनही दबक्या आवाजात होताना दिसतं. यूट्यूबच्या माध्यमातून मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि त्याला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद याविषयी खुलेपणानं फारसं बोललं जात नाही. तरीही प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आम्हाला योग्य दिशेनं वाटचाल करत असल्याची खात्री देतो आणि नवी ऊर्जा देतो.
-डॉ. अमोल कोल्हे , अभिनेता

