Headlines

मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


मालवण : मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २ ऑगस्ट रोजी मालवण येथील दर्यासारंग हॉटेलमध्ये उत्साहात पार पडली. या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी तसेच मालवण तालुका संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.

जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निरीक्षक विवेक आपटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा कार्यकारिणीसाठी मालवण तालुका संघटनेतर्फे दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. त्यामध्ये चंद्रशेखर हनुमंत सुपल आणि राहुल राजन कुळकर्णी यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.

यावेळी मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ललित बुधाजी ढोलम यांची अध्यक्ष, विद्यानंद वि. परब यांची उपाध्यक्ष, विरेश रं. येसाजी यांची सचिव, अमेय दी. पारकर यांची खजिनदार, सौ. श्रुती गोलतकर यांची सहसचिव, अमित अरुण भोगले यांची संघटन सचिव, तर सुदेश आचरेकर यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सभेत उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संघटनेच्या माध्यमातून औषध व्यवसायाशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडून सदस्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत