Headlines

भूताटकीच्या अफवेनंतर ‘डोमा’तील मुलींसाठी २८८ बेडचे नवे वसतिगृह ; घरी गेलेल्या मुलींच्या परतीची आशा


Amravati News:नवीन वसतिगृहात २८८ बेडची व्यवस्था असून सर्व विद्यार्थिनींना व्यवस्थित राहता आणि झोपता येईल. स्वच्छतागृहे, शौचालये तसेच हवेसाठी पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त इमारत १ सप्टेंबरपासून विद्यार्थिनींसाठी सुरू केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली.

आश्रमशाळा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,अमरावती : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थिनींचा भार असलेल्या जुन्या वसतिगृहाऐवजी प्रशस्त नवीन इमारतीत विद्यार्थिनींचे स्थलांतर करण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून नवीन वसतिगृहाचा नियमित वापर सुरू होणार आहे. नवीन इमारतीत २८८ बेडची व्यवस्था करण्यात आली असून, स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा विद्यार्थिनींना उपलब्ध होणार आहे.

वसतिगृहाची क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनी राहत होत्या

डोमा आश्रमशाळेतील वसतिगृहाची क्षमता अवघ्या १०० विद्यार्थिनींची असताना येथे ३००हून अधिक मुली राहत होत्या. एकाच बेडवर दोन-तीन मुलींना झोपण्याची वेळ येत होती. अपुरी व सुविधा नसलेली स्वच्छतागृहे, उकाडा, पंख्यांचा अभाव आणि मर्यादित जागा यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन जीवनावर मोठा ताण निर्माण झाला होता.

Maharashtra TimesAmravati Crime : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरण, वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांची साडेपाच वर्षांनी मुक्तता, सुप्रीम कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

भूताटकीच्या अफवा …..

याच पार्श्वभूमीवर काही विद्यार्थिनींमध्ये अचानक रडणे, हसणे, आरडाओरड करणे किंवा कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर परिसरात भुताटकीच्या अफवा पसरल्या. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर हा प्रकार मानसिक आजाराशी अर्थात ‘मास हिस्टेरिया’शी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

परिणामी ३०० हून अधिक मुली आश्रम सोडून गेल्या.

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत मुलींना झालेल्या भूतबाधेच्या अफवेने या आश्रमातील अनेक मुलींनी शाळा सोडल्याचे समोर आले होते. अपुऱ्या आश्रमातील सोयींचा परिणाम हा या आश्रमात राहणाऱ्या मुलींच्या मानसिकतेवर झाला.अचानक हसणे, रडणे , मुलींनी अचानक घुंगरांचे आवाज येणं असे प्रकार घडायला लागले. आणि ही वार्ता गावात समजताच या घटना भूतबाधेच्या समजल्या गेल्या. परिणामी ३०० हून अधिक असणाऱ्या मुली आश्रम सोडून गेल्या.

Maharashtra TimesRickshaw Driver: जा..मराठी नाही बोलणार! नवी मुंबईतील मुजोर रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल, RTO कडून शोध घेण्यास सुरुवात

ही केवळ अफवा

ही केवळ अफवा असल्याचे आरोग्य विभागाच्या पथकाने स्पष्ट केले. हिस्टेरिया ह्या मानसिक आजाराने ह्या घटना होत असल्याच स्पष्ट झालं.त्यामुळे आश्रमातील अपुऱ्या सोयींना आता पूर्ण करण्यात येत आहे. नवीन वसतिगृहात २८८ बेडची व्यवस्था करण्यात आली. १ स्पटेंबर पासून नवीन वसतिगृहाचा नियमित वापर सुरू होणार आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा