Headlines

भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?


मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातले सामने हे नेहमी प्रचंड चर्चेमध्ये राहिले आहेत. दोन्ही देश हे फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर लेजेंड्स लीगमध्येही आमनेसामने येतात. एशियन लेजेंड्स लीग २०२६ च्या दुसऱ्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असतना आता या लीगचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या लीगची खासियत म्हणजे निवृत्त माजी दिग्गज खेळाडू मैदानात उतरतात. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या महासंग्रामाची तारीख आता समोर आली आहे.

एशियन लेजेंड्स लीग म्हणजेच ALL चा यंदाचा हंगाम ३० जुलै रोजी सुरु होणार आहे. यावेळी तो झांबियासमधील लुसाका येथे सुरु होणार आहे. या लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये इंडियन रॉयल्स, एशियन स्टार्स, श्रीलंकन लायन्स, बांग्लादेश टायगर्स, अफगाणिस्तान पठाण्स आणि पाकिस्तान पँथर्स यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. ते आयपीएलमधील बाद फेरीच्या धर्तीवर असतील. या दिग्गजांच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील.

Maharashtra TimesAbishek Porel : अभिषेकला अटक करा; लग्नाच्या आमिषाने संबंधांचा आरोप, IPL क्रिकेटपटूला बेड्या ठोकण्याचे कोर्टाचे आदेश

एशियन लेजेंड्स लीग २०२६ मध्ये इंडियन रॉयल्सचा सामना पाकिस्तान पँथर्सशी होणार आहे. हा सामना २ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार आहे. लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लबमध्ये हा सामना पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता हा सामना सुरु होणार आहे. इंडियन रॉयल्स संघामध्ये शिखर धवन, सुरेश रैना, युसूफ पठाण, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक असे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. पाकिस्तान संघाकडून मोहम्मद हाफीज, सईद अजमल आणि सोहेल तन्वीर यांच्यासारखी मोठी नावे मैदानामध्ये खेळताना दिसतील, दोन्ही संघांना एक मोठा इतिहास राहिला आहे. या दिग्गजांना आपापल्या राष्ट्रीय फ्रँचायझींसाठी एकमेकांविरोधात खेळताना पाहणे हे चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे.

इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ

भारतीय रॉयल्स संघ : शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, फैज फजल, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, ऋषी धवन, पवन नेगी, नमन ओझा, दिनेश कार्तिक, हरभजन सिंग, शाहबाज नदीम, सुदीप त्यागी, अनुरीत सिंग, मनप्रीत जकाती, शबाबती गं.

Maharashtra TimesIND vs ENG ODI Series : काय सांगता! भारताविरूद्ध इंग्लंडचा एक खेळाडू तिन्ही सामन्यात NOT OUT; नेमका कोण?

पाकिस्तान पँथर्स संघ : उमर अकमल, शर्जील खान, सामी अस्लम, इम्रान नझीर, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, कामरान अकमल, अब्दुर रहमान, यासिर शाह, सोहेल तन्वीर, नावेद-उल-हसन, मोहम्मद इरफान, राहत अली, राणा नईम अन्वर, वहाब रियाझ, सईद अजमल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत