Headlines

बापाचा वारसा चालवणार पोरं! ज्युनियर ‘सेहवाग-द्रविड’ टीम इंडियात दाखल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर, पाहा वेळापत्रक


Ind Vs Aus U 19 TT : ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी आता टीम इंडियाची घोषणा झाली आहे. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय यांना मोठी संधी मिळाली आहे.

india u19 squad aryaveer sehwag anvay dravid australia tour
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढीने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाच्या भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय अंडर-१९ संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघ निवडीत सर्वात मोठी आणि लक्षवेधी बाब म्हणजे, भारताचे माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांची संघात झालेली दणदणीत एंट्री झाली आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे आणि २ मल्टी-डे (कसोटी) सामने खेळवले जाणार आहेत.

आर्यवीर सेहवागचा वनडे संघात जलवा

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या तो सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपला खेळ दाखवत आहे. १९ ऑक्टोबर २००७ रोजी जन्मलेला १८ वर्षीय आर्यवीर आपल्या वडिलांप्रमाणेच टॉप-ऑर्डरचा अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो आपल्या बॅटची ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Maharashtra TimesRishabh Pant News : जखमी वाघासारखा मैदानात परतला अन् धावांचं वादळ आलं; ऋषभ पंतला मेहनतीचं फळ मिळालं, आता ICCरँकिंगमध्ये थेट एक नंबर

अन्वय द्रविडवर पुन्हा दाखवला विश्वास

या संघात भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लेक अन्वय द्रविड यालाही संधी मिळाली आहे. अन्वय हा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही त्याने अंडर-१९ वनडे संघातून दोन सामने खेळले होते. त्या मालिकेत त्याने ११७ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ८७ आणि १४ धावांची खेळी केली होती. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.

नेतृत्वाची धुरा कुणाकडे?

या अत्यंत महत्त्वाच्या घरच्या मालिकेसाठी वनडे संघाचे कर्णधारपद लक्ष्य रायचंदानी याच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. तर, मल्टी-डे (कसोटी) मालिकेसाठी संघाचे नेतृत्व यशवर्धन चौहान करणार आहे.

Maharashtra TimesICC Test Ranking : ICC टेस्ट रँकिंग जाहीर, यॉर्कर किंग बुमराहने कसोटीतील नंबर वनचे सिंहासन गमावले; जाणून घ्या कारण

भारत अंडर-१९ वनडे संघ

लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल, आर्यवीर सहवाग, व्हीके विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), व्ही यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती व्यंकट आणि काव्या पटेल.

असे आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

तारीख सामना वेळ ठिकाण
१८ सप्टेंबर २०२६ पहिला वनडे सामना सकाळी ९:०० वाजता राजकोट
२१ सप्टेंबर २०२६ दुसऱा वनडे सामना सकाळी ९:०० वाजता राजकोट
२३ सप्टेंबर २०२६ तिसरा वनडे सामना सकाळी ९:०० वाजता राजकोट
२७-३० सप्टेंबर २०२६ पहिला मल्टी-डे (कसोटी) सामना सकाळी ९:३० वाजता राजकोट
५-८ ऑक्टोबर २०२६ दुसरा मल्टी-डे (कसोटी) सामना सकाळी ९:३० वाजता अहमदाबाद
सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा