Headlines

फ्लेमिंगनंतर CSKचा हेड कोच कोण? मॅथ्यू हेडनने थेट नाव सांगून टाकलं; म्हणाला, चेन्नई टच चेहरा हवा!


CSK New Headcoach : स्टीफन फ्लेमिंगनंतर CSKचा पुढचा हेड कोच कोण? मॅथ्यू हेडनने एका मोठ्या भारतीय नावाची शिफारस केली आहे. तर क्रिस श्रीकांतने मायकेल हसीला पसंती दिली.

Dinesh Karthik, CSK Head Coach
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : स्टीफन फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडल्यानंतर आता आयपीएल २०२७ मध्ये ‘यलो आर्मी’चा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असणार? या एकाच प्रश्नाने सध्या क्रिकेट जगतात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. ईऑन मॉर्गन आणि मायकेल हसी यांसारख्या बड्या दिग्गजांच्या नावांची चर्चा रंगत असतानाच, आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने एक अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक नाव समोर आणले आहे. हेडनच्या मते, सध्या आरसीबीचा मेंटॉर असलेला दिनेश कार्तिक सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वात योग्य आणि परफेक्ट चेहरा आहे.

‘दिनेश कार्तिक सर्वोत्तम पर्याय’

‘स्पोर्ट्सस्टार’शी बोलताना सीएसकेचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने नव्या प्रशिक्षकाच्या निवडीवर आपले मत मांडले. तो म्हणाला, “मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत काही नावांची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. मला वाटतं की कार्तिक या भूमिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही फ्रँचायझीसाठी परदेशी प्रशिक्षकाऐवजी स्थानिक मार्गदर्शक असणे अत्यंत गरजेचे असते. बहुतांश फ्रँचायझी नेहमी आंतरराष्ट्रीय चेहरे निवडतात, पण सीएसकेने तसे करू नये. त्यांनी या पदासाठी स्थानिक ‘चेन्नई टच’ चेहरा दिला पाहिजे आणि या निकषांमध्ये दिनेश कार्तिक अगदी तंतोतंत बसतो.”

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Video : शाब्बास रे पठ्ठ्या! वैभवचा बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही जलवा, बेबी बॉसच्या एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट

हेडन पुढे म्हणाला की, “फ्लेमिंगने एमएस धोनीसोबत मिळून अप्रतिम काम केले होते. या जोडीने सीएसकेचा एक अत्यंत मजबूत संघ उभारून अनेकदा चॅम्पियन बनवले. फ्लेमिंगची एक्झिट हा संघासाठी खूप मोठा बदल असेल. आता सीएसकेचे व्यवस्थापन याबाबत काय निर्णय घेते, हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

कृष्णम्माचारी श्रीकांत यांची मायकेल हसीला पसंती

दुसरीकडे, भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मात्र या पदासाठी मायकेल हसी याच्या नावाला कौल दिला आहे. ईऑन मॉर्गनच्या नावाचा विचारही करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

Dinesh Karthik, CSK Head Coach

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “सीएसकेकडे जेव्हा स्वतःचा मायकेल हसी उपलब्ध आहे, तेव्हा त्यांना बाहेरून कोणालाही आणण्याची गरज नाही. मायकेल हसी हाच मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वात उत्तम पर्याय ठरेल. त्याआधी आगामी काळात एमएस धोनीची संघात काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. त्यानंतरच बाकीच्या गोष्टी ठरवता येतील.”

स्टीफन फ्लेमिंग आणि एमएस धोनी या जोडीने रचलेला विजयाचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान नव्या प्रशिक्षकासमोर असणार आहे. त्यामुळे सीएसकेचे व्यवस्थापन परदेशी दिग्गजावर विश्वास दाखवते की हेडनने सुचवल्याप्रमाणे ‘लोकल बॉय’ दिनेश कार्तिकच्या हाती कमान सोपवते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा