Argentina vs Egypt Match : फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इजिप्तमधील सामना चर्चेत राहिला. इजिप्तने जवळपास हरवल्यात जमा होते मात्र शेवटच्या ११ मिनिटांत ३ गोल करत अर्जेंटिनाने सामना जिंकला. पण या सामन्यामध्ये रेफ्रींच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे.

अर्जेटिनाने उपांत्यपूर्व फेरीत इजिप्तचा ३-२ असा पराभव केला. न्यूयॉर्कमधील नव्या बससेवेचे उद्घाटन करताना मामदानी यांनी रेफ्रींना लक्ष्य केले. ‘वेगवान बससेवेमुळे तुमचा प्रवासात खर्च होणारा जास्तीचा वेळ कमी होईल. त्यामुळे कुटुंबीयांसह ब्रेकफास्ट घेता येईल. मुलांसह खेळता येईल. इजिप्तचे यश चोरून घेतले याबाबतची चर्चा मित्रांसह करता येईल,’ अशी प्रतिक्रिया मामदानी यांनी व्यक्त केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला..
यासेर इब्राहिम (१५ मि.) आणि झिको (६७ मि.) यांच्या गोलमुळे इजिप्तने आघाडी घेतली होती. लिओनेल मेस्सीची पेनल्टी किक; तसेच अर्जेंटिनाची आक्रमणे रोखून त्यांनी विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरू केली होती. मात्र, ख्रिस्तियन रोमेरो (७९ मि.) आणि लिओनेल मेस्सी (८३ मि.) यांच्या गोलमुळे अर्जेटिना बरोबरी साधली. एन्झो फनांडिस (९०+२ मि.) यांच्या गोलमुळे अर्जेटिनाने विजय मिळवला.
Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
रेफ्रींविरुद्ध तक्रार
इजिप्तने रेफ्री फ्रैंकॉईस लेटेक्सिएर (फ्रान्स) यांच्याविरोधात तक्रार केली आहे. रेफ्रींसह त्यांच्या सर्व सहाय्यकांचीही चौकशी करण्याची मागणी इजिप्तने फिफाकडे केली, तसेच आफ्रिकन संघांविरुद्ध युरोपातील रेफ्री पक्षपाती निर्णय देतात, असाही आक्षेप घेतला.
Cristiano Ronaldo : वर्ल्डकपमधून पोर्तुगाल बाहेर, रोनाल्डोचं स्वप्न अधुरं, शेवटच्या 1 मिनिटात गेम पालटला
गोल कसा रद्द होतो ?
- इजिप्त प्रतिआक्रमण सुरू करीत असताना मारवान अॅत्तिया याच्या पायाचा निसटता स्पर्श अर्जेंटिनाच्या लिसांद्रो मार्टिनेझ याला लागला असे सांगून झिकोने केलेला जबरदस्त गोल नाकारला.
- सामन्याचा वेग कायम राहण्यासाठी रेफ्रींना कमीतकमी फाउल देण्याची सूचना केली असल्याची ‘फिफा’चे रेफ्री प्रमुख पिएलुईगी कॉलिना यांची गेल्याच आठवड्यात माहिती
- पिएलुईगी यांनी या वर्ल्ड कपमध्ये सामन्यामागे सरासरी २२.६ फाउल्स, तर गतस्पर्धेत
- हेच प्रमाण २५ होते, तर २०१८च्या स्पर्धेत २७ होते, याकडे लक्ष वेधले.
- हे सर्व लक्षात घेतल्यास केवळ शर्टाला स्पर्श; तसेच अजाणतेपणे बूटावर हलकेच दाब पडल्यावर तो फाउल कसा, हा प्रश्न.
- जर्मनीच्या अलेक्झांडर पावलोविक गोल करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची किक इक्वेडोरच्या पेद्रो विता याच्या डोक्याला लागली होती; पण त्या वेळी पावलोविक याला ताकीद नाही, त्याच चालीवर लेरॉय सेन याने गोल
- केल्यानंतरही वारची मदत नाही.
- गोल झाल्यास त्याची चाल सुरू होताना; तसेच चालीदरम्यान कोणताही फाउल झाला होता का याची वार तपासणी करते असा दावा.
- या परिस्थितीत मोहम्मद सालाह याला पेनल्टी क्षेत्रात अवैधरीत्या रोखल्यानंतर इजिप्तला पेनल्टी किक नाकारली, त्या वेळी व्हिडिओ असिस्टंट रेफरीची मदतही घेणे का टाळले, हा प्रश्न
- सालाहला अवैधरीत्या रोखत अर्जेटिनाने चेंडूचा ताबा मिळवला होता. या परिस्थितीत त्यावेळीही वार अमलात येऊन गोल अवैध ठरायला हवा होता हा आक्षेप

