Headlines

फायर है! भारताकडून पहिल्यांदाच 12 LIVE मिसाईल्स तैनात; अख्खा पाकिस्तान टप्प्यात, शेजारी दहशतीत


Edited byManali Sagvekar|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Pakistani General Statement On Indian Missiles: भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आता इतका विकसित झाला आहे की, आता केवळ पाकिस्तान आणि चीनच नाही, तर युरोप-अमेरिकाही भारताच्या टप्प्यात येतील.

भारताकडून पहिल्यांदाच 12 LIVE मिसाईल्स तैनात
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
India Missile Power : यावेळी भारताच्या शक्तिला पाकिस्तानच नाही तर; लंडन, युरोप, वॉशिंग्टन हे पाश्चिमात्ये देशही हादरले आहेत. भारत आता केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित नसून, एक ग्लोबल सुपरपावर बनण्याच्या दिशेने वळत आहे. असे वक्तव्य स्वतःच घाबरलेल्या पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने, नुकत्याच भारताने विकसित केलेल्या आणि सध्या प्रगत टप्प्यात असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणांस्त्रांची शक्ती पाहता हा दावा केला आहे. या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या मदतीने भारताने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला असून, पाकिस्तानासह पाश्चिमात्य देशांनाही घाम फोडणाऱ्या हे क्षेपणास्त्र कोणते आहे आणि याची ताकद काय आहे, ते जाणून घेऊया.

भारताच्या अग्नि मिसाइलने पाकिस्तान हादरला

सेंटर फॉर इंटरनेशनल स्ट्रॅटेजिक स्टडीज तर्फे आयोजित केलेल्या पाकिस्तानच्या अणूकार्यक्रमावरील एका कार्यक्रमात राष्ट्रीय कमान प्राधिकरणाचे सल्लागार लेफ्टिनेंट जनरल मजहर जमील यांनी एक वक्तव्य केले. त्यांनी दावा केला की, भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलचा उद्देश भारताला अशी जागतिक अणूशक्ती बनवणे आहे ज्याच्या टप्प्यात प्रमुख पाश्चिमात्य देशांच्या राजधान्या देखील येऊ शकतील.

पाश्चिमात्य देशांना सावध राहण्याचा सल्ला

तसेच मजहर यांनी पाश्चिमात्य देशांच्या सरकारांना भारताच्या या वाढत्या लष्करी आधुनिकीकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या या क्षेपणास्त्र प्रणाल्या पाश्चिमात्य देशांच्या राजधान्यांपर्यंत पोहोचू शकतात. हे भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी पाश्चिमात्य देशांना या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

अग्नि-6 मिसाइलची ताकद बघून पाकिस्तान हादरला

भारताकडे असलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

पाकिस्तानी जनरलच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, भारताने विकसित केलेल्या आणि सध्या प्रगत टप्प्यात असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्रांमुळे पाश्चिमात्य जगाची झोप उडाली आहे. भारताच्या ताकदीची झलक दाखवणाऱ्या काही प्रमुख क्षेपणास्त्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  1. अग्नि-5 (Agni-V): अधिकृतपणे 5,500 किमी रेंज असलेली ही मिसाइल संरक्षण तज्ज्ञांच्या मते 8,000 किमीपर्यंत लक्ष्य करू शकते. यात वापरण्यात आलेले एमआयआपव्ही तंत्रज्ञान एकाच वेळी अनेक शहरांवर अचूक अणू हल्ला करण्यास सक्षम आहे.
  2. अग्नि-6 (Agni-VI): हे भारताचे नवीन सुपर अस्त्र बनवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. जून 2026 मध्ये ओडिशा समुद्रकिनाऱ्यावर त्याची चाचणी होणार असल्याने तिथे सतर्कता बाळगण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र 8,000 ते 12,000 किमीपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ ते अमेरिका आणि युरोपलाही लक्ष्य करू शकते. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या थाड (THAAD) सारख्या मजबूत संरक्षण यंत्रणेला देखील टक्कर देऊ शकते.
  3. K-सिरिज (K-4, K-5, K-6): ही खास क्षेपणास्त्रे जमिनीवरून नाही, तर पाण्याखालून पानबुडीतून डागली जातात. यांची रेंज 6,000 ते 8,000 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. म्हणजेच पानबुडी हिंदी महासागरात कुठेही लपलेली असेल, तरीही तिथून जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या शत्रूला अचूक लक्ष्य करू शकतो.

पाकिस्तानची भारताला धमकी देण्याची मजल

दरम्यान, भारताच्या या जागतिक ताकदीचा धसका घेत जनरल जमील यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षचाही उल्लेख केला. त्यावेळी पाकिस्तानने निवडलेला शांत राहण्याचा एक सुविचारित निर्णय होता, असा दावा त्यांनी केला. मात्र, भारताच्या हातून इतक्या वेळा जोरदार मार खाऊनही, कोडगा पाकिस्तान कधीही सुधारणार नाही हे सिद्ध करताना, त्यांनी ‘भविष्यात भारताकडून कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न झाल्यास पाकिस्तानकडून चोख आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल’ अशी पोकळ धमकीही दिली.

Manali Sagvekar

लेखकाबद्दलManali Sagvekarमनाली सुनील सागवेकर या सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये डिजिटल विभागात कन्सलटंट म्हणून कार्यरत असून, त्या एक अनुभवी तरुण पत्रकार आहेत. विरार (पश्चिम) येथील विवा महाविद्यालयातून ‘मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन’ (BAMMC) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या मटा ऑनलाइनसाठी बिझनेस आणि आंतरराष्ट्रीय विषयक बातम्यांसाठी लेखन करत आहेत.मनाली यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात सकाळ मिडिया ग्रुपममधून केली. त्यानंतर ‘साम टीव्ही’च्या डिजिटल न्यूज रूममध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करताना त्यांनी चालू घडामोडींवर तसेच सविस्तर बातम्यांवर काम केले. डिजिटल माध्यमांसाठी लागणारा वेगवान मजकूर तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘झी 24 तास’ सारख्या नामांकित संस्थेत राजकारण, महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विषयावरील बातम्या केल्या आहेत.मनाली यांना लेखनासोबतच तांत्रिक बाबींचेही उत्तम ज्ञान आहे. त्या VN आणि InShot सारख्या टूल्सचा वापर करून प्रभावी व्हिडिओ एडिटिंग करतात, तसेच त्यांना QuarkXPress आणि Google Workspace यांसारख्या आधुनिक कंटेंट मॅनेजमेंट टूल्सचाही सराव आहे.मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रगल्भता यामुळे त्या जागतिक स्तरावरील बातम्यांचे स्थानिक भाषेत अचूक रूपांतर करण्यास सक्षम आहेत. सोशल मीडिया ट्रेंड्सची जाण आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी लेखनशैली ही त्यांची जमेची बाजू आहे. सातत्याने बदलणाऱ्या डिजिटल मीडियाच्या जगात विश्वासार्ह आणि संशोधनात्मक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून त्या आपल्या प्रगल्भ लेखनाने आणि विविध विषयांवरील पकडीने वाचकांशी संवाद साधत आहेत.आणखी वाचा