शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. मध्यरात्री झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आधीच पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार अशा चर्चा कानी पडत असतानाच जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा उत्सुकता वाढली होती. शिवाय या भेटीदरम्यान प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, असं म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांनंतर आता स्वतः जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.