Headlines

प्रसिद्ध फुटबॉलपटूला गोळ्या झाडून संपवलं, पाच महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; गरोदर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला


Footballer saleem al ashkar death : पत्नी गरोदर असतानाच पॅलेस्टाईनच्या 32 वर्षीय गोलरक्षकाचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी फुटबॉल महासंघाने या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे या घटनेवरुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Palestinian Goalkeeper Saleem Khader Al ashqar News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेची रंगत शिगेला पोहोचली असतानाच फुटबॉल विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनचा गोलकीपर सलीम खादर अल-अश्कर याचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेची अधिकृत माहिती पॅलेस्टिनी फुटबॉल महासंघाने (PFA) दिली आहे. 32 वर्षीय सलीम अल-अश्कर हा खान युनिस सर्व्हिसेस क्लबकडून गोलरक्षक म्हणून खेळत होता. महासंघाच्या माहितीनुसार, खान युनिसच्या ईशान्येकडील अल-करारा भागात गोळीबारात सुरु होता, त्यादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पॅलेस्टिनी फुटबॉल जगतामध्ये मोठी शोककळा पसरली आहे, सोबतच या घटनेने खळबळही उडाली आहे.

लग्नाला अवघे पाच महिने

सलीम याच्या निधनाची सर्वाधिक वेदनादायक बाब म्हणजे त्याचे कौटुंबिक जीवन. सलीमचे लग्न अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच पार पडले होते. त्याच्या पत्नीला पहिल्या अपत्याची चाहूल लागली आहे. मात्र आपल्या बाळाचा चेहराही पाहण्यापूर्वीच सलीमने जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पॅलेस्टिनी फुटबॉल महासंघाच्या पोस्टवर हजारो लोकांनी श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

Maharashtra TimesKaranbir Singh : हिटमॅनलाही मागे टाकणारा हा खेळाडू आहे तरी कोण? पठ्ठ्यानं अवघ्या 60 सामन्यांत धुमाकूळ घातला

सात बहिणींचा एकुलता एक भाऊ

महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, सलीम हा सात बहिणींचा एकुलता एक भाऊदेखील होता. त्याच्या निधनामुळे पत्नी, जन्माला येणारे बाळ आणि संपूर्ण कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनीही या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.

Maharashtra TimesSamit Dravid : फक्त 32 धावा, पण तरीही राहुल द्रविडच्या मुलाचीच चर्चा; नेमकं काय कारण?

हजारो खेळाडूंनी गमावला जीव

दरम्यान, गाझामधील संघर्षाचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 1,009 पॅलेस्टिनी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 567 जण फुटबॉलशी संबंधित खेळाडू, प्रशिक्षक किंवा पंच होते. या आकडेवारीवरून या संघर्षाचा पॅलेस्टाईनच्या क्रीडा विश्वावर किती मोठा परिणाम झाला आहे, याची कल्पना येते. अनेक क्लब उद्ध्वस्त झाले असून, अनेक उदयोन्मुख खेळाडूंची कारकीर्दही या संघर्षामुळे अर्धवट थांबली आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपावा, अशी इच्छा प्रत्येक व्यक्ती व्यक्त करताना दिसून येतो.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा