![]()
पाकिस्तानच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची चिन्हे दिसू लागली आहेत. लष्करप्रमुख असीम मुनीर आणि इम्रान खान यांच्यात लवकरच तडजोड होऊ शकते. या प्रक्रियेत इम्रान यांची बहीण नौरीन नियाजी मध्यस्थाची भूमिकेत आहे. मुनीर यांनी या तडजोडीच्या अटी इम्रान यांना कळवल्या. मुनीर, लष्कराच्या विरोधात वक्तव्ये करणे इम्रान यांना थांबवावे लागेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इम्रान यांना खासगी रुग्णालयात दाखल करताना अडियाला तुरुंगात बहीण नौरीनही होत्या. या भेटीत त्यांनी अटींची माहिती इम्रान यांना दिली. शाहबाज सरकारकडून अर्ज मागे इम्रान यांना खासगी रुग्णालयात भरती करण्याच्या आदेशाविरोधात शाहबाज सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते. गुरुवारी सरकारने हा अर्ज मागे घेतला. मुनीर यांच्या सांगण्यावरूनच हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. कादिर ट्रस्ट, तोशखाना प्रकरणी ते १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत.इतर ८ खटल्यात शिक्षा जाहीर नाही. तडजोड का… सुटकेतून प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न इम्रान खान यांच्या सुटकेत भूमिका बजावून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा सुधारण्याचा लष्करप्रमुख मुनीर यांचा प्रयत्न आहे. इम्रान जगभरात प्रसिद्ध आहेत. तीन वर्षांपासून तुरुंगातील इम्रान यांना मुनीर धोका मानत नाहीत. इम्रानही मुनीर यांच्याविरोधात बोलणे बंद करण्यास तयार होत आहेत. . अमेरिकन व ब्रिटिश संसदेत ३५ व खासदारांनी इम्रान यांच्या सुटकेसाठी आवाज उठवला. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, लंडनमध्ये मोर्चे काढले होते. शरीफ यांना उत्तर….दिल्लीत उच्चायुक्तालयाबाहेर बुलडोझर कारवाई, बॅरिकेड्स, फेन्सिंग हटवले नवी दिल्ली |पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स व फेन्सिंग हटवले आहे. सीमेबाहेरील अनधिकृत बांधकाम बुलडोझरने हटवले. काही दिवसांपूर्वी शाहबाज शरीफ सरकारने इस्लामाबादच्या भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर अशीच कारवाई केली होती.
Source link
पाकिस्तान:मुनीरसोबत तडजोड शक्य, इम्रान तुरुंगाबाहेर येणार, इम्रान यांची बहीण नौरीनची मध्यस्थी
