![]()
भगवंताची कृपा सर्वांवर होते. मात्र दोन कारणांमुळे तिचा लाभ मिळत नाही— विश्वासाची कमतरता व मूर्खपणाचा अतिरेक. ईश्वर म्हणजेच विश्वासाचे दुसरे नाव आहे; पण मूर्खपणा आपल्याला त्या विश्वासापासून दूर नेतो. गरुडजींना काकभुशुंडीजी म्हणाले, “राम कृपा आपनि जड़ताई, कहउं खगेस सुनहु मन लाई.’ म्हणजे, “हे गरुडराज,श्रीरामांची कृपा आणि माझ्या मूर्खपणाबद्दल सांगतो, मन लावून ऐका. ’परमात्म्याशी संबंधित कोणतीही कृती करताना मन लावले पाहिजे. एकाग्रचित्त असले पाहिजे. आपण परमात्म्यावर विश्वास ठेवला, तरपरमात्म्याने कृपा करण्यासाठी एकापेक्षा एक मार्ग निर्माण केले आहेत.आपण पाणी एखाद्या भांड्यातून पितो. परमेश्वराने त्या अत्यंतमहत्त्वाच्या पात्राला ‘कलश’ बनवले. आपण त्याची पूजा करतो . त्यात परमात्म्याचा वास मानतो. ते परमात्म्याच्या कृपेचे अक्षय पात्र बनतो.म्हणूनच शोभायात्रांमध्ये डोक्यावर कलश घेऊन लोक सहभागीहोतात. म्हणून देवावरील आपला विश्वास उडून जाईल, असा मूर्खपणाकरू नका.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवावरील विश्वास उडेल असा मूर्खपणा करू नका
