Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवावरील विश्वास उडेल‎ असा मूर्खपणा करू नका‎




भगवंताची कृपा सर्वांवर होते. मात्र दोन कारणांमुळे तिचा लाभ मिळत‎ नाही— विश्वासाची कमतरता व मूर्खपणाचा अतिरेक. ईश्वर ‎म्हणजेच विश्वासाचे दुसरे नाव आहे; पण मूर्खपणा आपल्याला त्या ‎विश्वासापासून दूर नेतो. गरुडजींना काकभुशुंडीजी म्हणाले, “राम कृपा ‎आपनि जड़ताई, कहउं खगेस सुनहु मन लाई.’ म्हणजे, “हे गरुडराज,‎श्रीरामांची कृपा आणि माझ्या मूर्खपणाबद्दल सांगतो, मन लावून ऐका. ’‎परमात्म्याशी संबंधित कोणतीही कृती करताना मन लावले पाहिजे.‎ एकाग्रचित्त असले पाहिजे. आपण परमात्म्यावर विश्वास ठेवला, तर‎परमात्म्याने कृपा करण्यासाठी एकापेक्षा एक मार्ग निर्माण केले आहेत.‎आपण पाणी एखाद्या भांड्यातून पितो. परमेश्वराने त्या अत्यंत‎महत्त्वाच्या पात्राला ‘कलश’ बनवले. आपण त्याची पूजा करतो . त्यात‎ परमात्म्याचा वास मानतो. ते परमात्म्याच्या कृपेचे अक्षय पात्र बनतो.‎म्हणूनच शोभायात्रांमध्ये डोक्यावर कलश घेऊन लोक सहभागी‎होतात. म्हणून देवावरील आपला विश्वास उडून जाईल, असा मूर्खपणा‎करू नका.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत