![]()
एखादी गोष्ट म्हणी किंवा उदाहरणांतून पटवून देण्यात संत तुलसीदासयांचा हात कोणी धरू शकत नव्हते. गरुडाशी संवाद साधताना त्यांनीम्हटले होते— ‘रामचंद्र के भजन बिनु जो चह पद निर्बान, ज्ञानवंतअपि सो नर पसु बिनु पूँछ बिषान।” म्हणजेच, श्रीरामांच्या भक्तीशिवायमोक्ष मिळवू पाहतो, तो माणूस कितीही ज्ञानी असला, तरी तो शेपटी वशिंगे नसलेल्या जनावरासारखाच आहे. इथे मोक्ष म्हणजे केवळमृत्यूनंतरची अवस्था असा अर्थ घेऊ नये. मनातील वाईट विचार निघूनजाणे, आयुष्यात खरी शांती मिळणे म्हणजेच मोक्ष होय. पण यासाठीदेवाचे भजन करत राहिले पाहिजे. इथे त्यांनी प्राण्यांची तुलना शिंगे वशेपटीशी केली आहे. शिंगांमध्ये आक्रमकता तर शेपटीत स्वतःचे रक्षणकरण्याची ताकद असते. तुलसीदास म्हणतात की, या दोन्ही गोष्टीनसतील तर तो प्राणी काहीच कामाचा उरत नाही. माणसात हे दोन गुणअसावेत. स्पर्धेच्या युगात थोडे आक्रमक व सोबत नम्रताही राहावी.तरुण पिढीने तुलसीदासांच्या या ओळींचा हाच खरा अर्थ समजून घ्यावा.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:शिंगांमध्ये आक्रमकता, शेपटीत सुरक्षा, दोन्हीचे महत्त्व वेगळे
