Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नम्र वागणूक काय आहे हे ‎हनुमानजींकडून शिकावे‎




जसे काही प्रॉडक्ट बाजारातून गायब झाले आहेत तसेच मनुष्य‎जीवनातील काही व्यवहार आजकाल गायब झाले आहेत. त्यापैकी दोन‎म्हणजे- विनम्र शब्द आणि नम्र वागणूक. ज्याला पाहावे तो भाषेतील‎उद्धटपणा आणि आक्रमकतेला यशासाठी गरजेचे मानतो. ओटीटी आणि‎सोशल मीडियामुळे युवा पिढीने खास बोलीभाषेची शैली आपल्या‎सवयीची करून घेतली आहे. ही पिढी कोविडच्या आधीची आणि‎कोविडच्या नंतरची अशी बनली आहे. माणसाच्या वागण्याच्या शैलीत‎खूप फरक पडला आहे. विनम्र शब्द आणि नम्र वागणूक म्हणजे काय‎असते हे हनुमानजी तेव्हा शिकवतात, जेव्हा ते सुग्रीवाजवळ गेले होते.‎सुग्रीव श्रीरामांचे काम विसरून गेले होते. हा एक अपराध होता म्हणून‎हनुमानजी आपल्या राजाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा एक ओळ‎लिहिलेली आहे- ‘निकट जाइ चरनन्हि सिरु नावा। चारिहु बिधि तेहि‎कहि समुझावा।’ प्रणाम केला ही नम्रता आहे आणि ज्या शब्दांमध्ये‎समजावले, ते सुग्रीवला लगेच समजले. आपण हनुमान भक्ती कमीत‎कमी आपल्या शब्दांत आणि आपल्या आचरणात अशा प्रकारे उतरवली‎पाहिजे. ‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत