![]()
भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेकडे ‘दिव्य मराठी’ने ‘जनतेचा आवाज’ सदरात लक्ष वेधले होते, त्याचा परिणाम म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छावणी प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. भिंगारसह पंचक्रोशी आणि नागरदेवळे उपनगरातील हजारो नागरिकांसाठी ही स्मशानभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याचे शेड जीर्ण होऊन गळत होते, तर प्रवेशद्वार आणि बसण्याचे ओटे मोडकळीस आले होते. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी नातेवाईकांना पाऊस थांबेपर्यंत ताटकळावे लागत होते. प्रशासनाने तातडीने डागडुजी सुरू केली असली तरी, जालिंदर बोरुडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ‘तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा’ अशी भूमिका घेतली आहे. अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील अमरधामच्या धर्तीवर येथे सर्व सुविधायुक्त आधुनिक आरसीसी स्मशानभूमी उभारावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. सध्या सुरू असलेली कामे छावणी प्रशासनाकडून जीर्ण झालेले पत्र्याचे शेड बदलणे, गळती रोखणे, तुटलेल्या जाळ्या दुरुस्त करणे, मोडकळीस आलेले लोखंडी प्रवेशद्वार व्यवस्थित करणे आणि बसण्याच्या ओट्यांची डागडुजी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आरसीसी स्मशानभूमी हवी ^ झालेली डागडुजी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. प्रशासनाने नालेगाव अमरधामच्या धर्तीवर भिंगारमध्ये स्वतंत्र निधी मंजूर करून मजबूत आरसीसी शेड व आधुनिक नागरी सुविधा पुरवाव्यात; अन्यथा आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छेडू. – जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते
Source link
दिव्य मराठी इम्पॅक्ट:शुक्लेश्वर स्मशानभूमी छतास नवे पत्रे, छावणी प्रशासनाकडून तातडीने दखल घेत दुरुस्तीला सुरुवात
