Headlines

दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार! क्रिकेटपटूंचेही मन हेलावले, सचिन, युवी, गिलसह दिग्गजांनी कोणाची बाजू घेतली?


Student Protest: दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, युवराज सिंहसह क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं कोण काय म्हणाले?

Jantar Mantar Protest
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. २० जुलै रोजी जंतरमंतरवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर या आंदोलनाची चर्चा आणखी वाढली. अशातच आता क्रिकेट विश्वातूनही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर , भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांच्यासह युवराज सिंह, मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.

सचिन तेंडुलकरने काय म्हटलं?

सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांचा दाखला देत शिक्षण आणि मूल्यांबाबत भाष्य केलं आहे. सचिनचे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचं सचिनने सांगितलं. लहानपणापासूनच आपल्याला अपयश स्वीकारणं ठीक आहे, मात्र फसवणूक कधीही मान्य करू नये आणि आयुष्यात शॉर्टकटचा मार्ग निवडू नये, हे शिकवलं गेलं, असं सचिनने म्हटलं. समाजानेही केवळ निकालाला महत्त्व देण्याऐवजी मेहनत आणि योग्य मूल्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी भूमिका त्याने मांडली.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Video : फिफ्टीचं सेलिब्रेशन करताना वैभवनं खास व्यक्तीसाठी केला प्रेमळ इशारा, ड्रेसिंग रूमकडे पाहून नेमकं काय केलं? पाहा व्हिडिओ

शुभमन गिलने विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. एका तरुण भारतीयाच्या नात्याने प्रत्येक तरुणाला शिकण्याची, स्वप्न पाहण्याची आणि आपलं भविष्य घडवण्याची संधी मिळायला हवी, असं गिलने म्हटलं. शांततेच्या मार्गाने आपला आवाज उठवणाऱ्या तरुणांबद्दल त्याने आदर व्यक्त केला. ‘शिक्षणात आपल्या देशाचं भविष्य घडवण्याची ताकद आहे. आपण संवेदनशीलता, परस्पर सन्मान आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हिताचा विचार करून पुढे जाऊ,’ अशी अपेक्षाही गिलने व्यक्त केली.

Maharashtra TimesIND vs PAK : आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे शेड्यूल जाहीर! भारत-पाक महामुकाबला होणार पण एका अटीवर, दोन्ही संघांना जिंकावं लागणार; समीकरण जाणून घ्या

युवराज सिंहनेही मांडली भूमिका

माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. प्रत्येक मुलाला आणि विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळायला हवी, असं त्याने म्हटलं. विद्यार्थ्यांचं कल्याण हाच चांगल्या भारताचा पाया असल्याचं सांगत युवराजने सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाला संधी आणि आशा मिळेल, असा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. संवादाच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढता येईल, असंही त्याने म्हटलं.

मोहम्मद कैफ पोलिसांच्या कारवाईवर नाराज

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. एक वडील म्हणून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी गैरवर्तन होताना पाहून दुःख होत असल्याचं कैफने म्हटलं. दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांवर होणारा लाठीचार्ज थांबायला हवा, अशी भूमिका त्याने मांडली. तसेच लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी अपेक्षाही कैफने व्यक्त केली.

Maharashtra TimesIND vs ZIM : अरे काय रे! भारताने झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला, पण कॅप्टन सिकंदरने दिलं भलतंच कारण; मॅच झाल्यावर काय म्हणाला?

इरफान पठाणनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत त्यांना पाठिंबा दिला. प्रत्येक विद्यार्थी चांगल्या भविष्यासाठी अनेक वर्षे मेहनत करतो. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडूनही अनेक त्याग केले जातात, असं पठाणने म्हटलं. पेपर लीकसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आशा आणि स्वप्नांवर परिणाम होऊ नये, असं त्याने स्पष्ट केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य संधी मिळेल, याची खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पावलं उचलावीत, अशी अपेक्षाही पठाणने व्यक्त केली. ‘आपले विद्यार्थी हेच आपलं भविष्य आहेत. त्यांच्या स्वप्नांचं रक्षण करा,’ असा संदेश इरफान पठाणने दिला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा