Thane-Belapur Road: नवी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: नवी मुंबईला ठाणे शहरासोबत जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्याला लागलेले वाहतूककोंडीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. ठाणे-बेलापूर रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे स्थानकाबाहेर असलेली चुकीची वाहन पार्किंग व्यवस्था आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडी नियमित आहे. मात्र त्यातही सध्या रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या खोदकामामुळे कोंडीत भर पडली आहे. तुर्भे नाक्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे येथे वाहनांचा वेग मंदावला आहे.
पुणे, गोवा, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फायदा
ठाण्याहून थेट बेलापूर गाठण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने काँक्रीटीकरण करण्यात आले. नवी मुंबईतून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाचा खर्च महापालिकेने उचलला आणि ठाणे-बेलापूर रस्त्याची दुरवस्था दूर केली. हा रस्ता चांगला झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. ठाण्याहून पुण्याकडे, गोव्याकडे आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या याच मार्गाने पुढे मार्गस्थ होतात. ठाणे-बेलापूर मार्गाला लागून असलेल्या एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी येणाऱ्या गाड्यांची वर्दळ याच मार्गावरून सुरू असते.
ठाणे-बेलापूर मार्गावर दिघ्यापासून ते जुईनगरपर्यंतची सर्व रेल्वे स्थानके थेट जोडलेली आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर वाहने आणि प्रवासी थेट ठाणे-बेलापूर रस्त्यावर उतरतात. स्थानकांच्या बाहेर रिक्षा स्टँड आहेत. वाहनांची अवैध पार्किंग येथे होते. त्यामुळे तेथे गर्दी असते. प्रवाशांची ये-जा आणि या गर्दीमुळे वाहनांचा वेग मंदावतो. प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर हीच परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर अर्धा तास या वाहतूककोंडीत वाया जातो. सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने कोंडीत भर पडत आहे.
खासगी पार्किंगचा विळखा
ठाणे-बेलापूर मार्गाला लागून असलेल्या कंपन्यांच्या गाड्या या मार्गाला असलेल्या सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या असतात, त्यामुळे निम्मा रस्ता पार्किंगमध्येच जातो. त्यामुळे सहापदरी रस्ता असूनही विशेषतः सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते.
या मार्गावर सर्वाधिक वाहतूककोंडी होणारा भाग म्हणजे तुर्भे नाका. या कोंडीत या पावसाळ्यात येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने भरच पडणार आहे. उड्डाणपुलाचे काम या वर्षभरात तरी पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या मार्गावर हे काम होईपर्यंत वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचण्याची समस्या कायम राहणार आहे आणि त्यामुळे वाहनांना या रस्त्यावरून मार्ग काढताना नाकी नऊ येणार आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरून ऐरोलीमध्ये शिरण्यासाठी खाली उतरावे लागते आणि तेथे ऐरोली-मुलुंड मार्ग सुरू होतो. मात्र हा रस्ता खोल असल्याने येथे दरवर्षी पाणी तुंबते आणि गाड्या अडकतात. प्रवाशांना येथून गाड्या बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा