जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी – washim zp school accident part of slab collapse class is in lecture student seriously injured
जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी – washim zp school accident part of slab collapse class is in lecture student seriously injured
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून, या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाल्याचे अनेक व्हिडिओ बातम्या समोर येतात. अशा अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वर्गात शिकत आहेत.राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. वर्गात तासिका सुरू असतानाचा स्लॅबचे प्लास्टर कोसळले आणि यात बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. वाशिममधील भटउमरा गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही दुर्घटना घडली.
भटउमरा गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात तास सुरू होता अचानक एका कोपऱ्यातील स्लॅबचा भाग कोसळला. तेथे बसलेल्या विद्यार्थ्यावर त्या भागाचे तुकडे पडले ज्यात तेथे बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्याला तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. शिवाजी उमाळे विद्यार्थ्याचे नाव असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. या घटनेने शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले आहेत. तसेच पालकांनाही पाल्याबद्दलची चिंता वाढली आहे. शाळेची इमारत दहा वर्षापूर्वीच बांधण्यात आली होती.
या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर येत आहे. त्यात दिसून येते की स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला असून. वर्गातील बॅंचवर बॅगवर त्याचे तुकडे पडले आहेत तसेच वर्गात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे पडल्याचे दिसत आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरावस्था समोर आली आहे. गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्यातील काही शाळांची दुरावस्था ही भीषण आहे. पावसाळ्यात अनेक शाळांमध्ये छत गळत असल्याचेही समोर येते. कोल्हापूरमधील शिये गावातील एका कन्याशाळेची अवस्थाही भयानक होती.कौल फुटली होती. इमारतीच्या काही भागाची पडझड झाली होती. अखेर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. नगरपालिकेच्या शाळेतही दुरावस्था समोर आली आहे. काचा फुटल्या आहे. भिंतींना भेगा पडल्या आहे. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था ही भीषण आहे. वाशिममधील घटनेने अशा शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांकडून अशा शाळांबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. राजकारण, व्यापार, देश-विदेश, क्रीडा, करिअर यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे.
बीएमएमचं शिक्षण घेत असताना त्यांनी झी २४ तास या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज डेस्कवर काम केले . त्यादरम्यानच त्यांनी जनसंपर्क क्षेत्रातही काम केले. त्यावेळी राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नियोजनात त्यांचा सहभाग होता. व्यावसायिक कॉन्फरन्सचे आयोजनामध्येही सक्रीय सहभाग घेतला. २०१७ मध्ये महाविद्यालयातील सहकाऱ्यांसोबत वेब महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल त्यांनी सुरू केले. ज्यात क्रीडा, राजकारण, देश-विदेश, सिनेमा यासाठी बातम्यांचे लेखन केले. पोर्टलचे सोशल मीडिया हँडलही त्यांनी सांभाळले. पुढे विविध इंस्टाग्राम पेजसाठीही कंटेन्टची निर्मिती केली.
२०२४ मध्ये त्यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वेबसाईटसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. तेथे करिअर, महाराष्ट्र, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातम्या करण्यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणूक , प्रचारसभा, निकाल यांचे विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विशेषत: आंतरराष्ट्रीय, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना त्यांनी प्राधान्य दिलं. बिजनेस सक्सेस स्टोरी, मुंबई लोकल स्टेशनच्या नावाचा इतिहास, प्रजासत्ताक दिन आदी विषयांवर लेख मालिका लिहिली. यासोबत देश, स्थानिक स्तरावरील राजकारण क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बिहार, दिल्ली, मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणूक, निकाल यांचे विश्लेषण केले.
शिक्षण क्षेत्र
२०१७ मध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि माध्यम विभागात शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पालघर येथील वाडा महाविद्यालय, मिरारोड येथील एल आर तिवारी महाविद्यालय, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात माध्यम विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपरही सादर केला. सध्या ते साठ्ये महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
शैक्षणिक पात्रता
नारायण परब यांनी २०१४ मध्ये साठ्ये महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. २०१७ मध्ये त्यांनी मुबई विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सामान्य-ज्ञान स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके जिंकली. वाचन, खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये त्यांना रुची आहे.… आणखी वाचा