![]()
ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत उपोषणकर्ते बापूजी मोगरे यांच्या मागण्या आणि तक्रारींची दखल घेत पंचायत समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. चौकशीच्या काळात ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत राहावे, या उद्देशाने ग्रामविकास अ
.
गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी स्वतंत्र आदेश काढून ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्याकडील ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा तात्पुरता कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज करताना भामरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासकीय दृष्टीने चौकशी आवश्यक असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशीच्या कालावधीत ग्रामपंचायतीचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे, यासाठी भामरे यांच्याकडील जायखेडा ग्रामपंचायतीचा तात्पुरता कार्यभार किकवारी खुर्द येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रविण सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भामरे यांनी ग्रामपंचायतीचा कार्यभार तत्काळ सावंत यांच्याकडे हस्तांतरित करून कार्यभार हस्तांतरणाची यादी कार्यालयास सादर करावी, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
