Headlines

छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा:आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत बिडकीनच्या तेजस पाटीलने पटकावली 3 पदके




बिडकीन येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनोज पाटील यांचे सुपुत्र तेजस पाटील यांनी नायजेरिया येथे झालेल्या कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तेजस यांनी या स्पर्धेत तब्बल तीन आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली असून, त्यांच्या या यशाबद्दल बिडकीन पोलीस ठाण्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तेजस पाटील यांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंडर-23 वैयक्तिक गटात रौप्यपदक, वरिष्ठ वैयक्तिक गटात कांस्यपदक, तर वरिष्ठ सांघिक (Team) गटात रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. बिडकीन पोलीस ठाण्यात गौरव सोहळा तेजस यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल बिडकीन पोलीस ठाण्याच्या वतीने एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तेजस पाटील यांचा भव्य गौरव करण्यात आला. तसेच, तेजस यांचे प्रेरणास्थान असलेले त्यांचे वडील आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना तेजस यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील खडतर अनुभव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील थरार शेअर केला. “क्रीडा क्षेत्रामुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि शिस्त वाढण्यास मदत होते. आजच्या युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही हिरीरीने भाग घेऊन देश व राज्याचे नाव मोठे करावे.” — उपस्थित पोलीस अधिकारी भविष्यातही तेजस यांनी अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून आणखी मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या. पोलीस अधिकारी व अंमलदारांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित शेकडे यांनी केले. या गौरव सोहळ्याला पोलीस उपनिरीक्षक संभाजी झीजुर्डे, पो. उ. नि. उबाळे, भास्कर खुळे, पो. हे. कॉ. सचिन आगलावे, अमोल मगर, योगेश नाडे, हनुमान धनवे, संदीप धनेधर, पो. हे. कॉ. वाजेद शेख, वाघमोडे, पवन चव्हाण, शेखर जाधव यांच्यासह बिडकीन पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत