Headlines

घे भरारी फाउंडेशनतर्फे केसरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशनतर्फे दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून केसरी गावातील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता सावंत, डॉ. निखिल अवधूत, डॉ. नेहा सावंत, डॉ. नेत्रा सावंत, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सतीश सावंत तसेच डॉ. कशाळीकर मॅडम हे उपस्थित राहून रुग्णांची डोळे, दात तसेच इतर आजारांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच, यशराज हॉस्पिटल, सावंतवाडीचे डॉ. यश नवांगुळ हे उपस्थित राहून आयुष्मान भारत कार्डबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील रक्त तपासणी तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांची हिमोग्लोबिन तपासणी करणार असून, आवश्यक वाटल्यास गोळ्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन घे भरारी फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष मोहिनी मडगावकर, अध्यक्ष, उपाध्यक्ष मेघना राऊळ, कार्याध्यक्ष रिया रेडीज, खजिनदार-सचिव मेघा दुबळे, मेघना साळगावकर तसेच सर्व संचालिकांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत