कुख्यात गँगस्टर्सच्या दहशतीने राजस्थान आणि हरियाणाचा सीमावर्ती भाग अनेकदा हादरलेला असतो. पण याच भागात आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये या खतरनाक गँगस्टर्सचं कंबरडं मोडणारा एक २२ वर्षांचा तरुण आयपीएस अधिकारी सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांचं नाव आहे IPS अभिजीत पाटील . मराठमोळे IPS अधिकारी अभिजीत पाटील हे सध्या आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे गाजत आहेत. त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये कुख्यात गँगस्टर्सच्या मुसक्या आवळत त्यांचे नेटवर्क उध्वस्त केले आहे. पण ही कामगिरी त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान आणि हरियाणा या राज्यांच्या सीमेवर केली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी, कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करून आयपीएस बनलेले अभिजीत पाटील हे राजस्थान कॅडरमधील सर्वात तरुण पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील राजगड वर्तुळात सहायक पोलीस अधीक्षक आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्स चे प्रमुख म्हणून त्यांनी केलेली धडाकेबाज कामगिरी गुन्हेगारी जगताला हादरा देणारी ठरली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की कोण आहेत आयपीएस अभिजीत पाटील आणि त्यांनी पहिल्याच पोस्टिंगमध्ये कसं धडाकेबाज काम केलंय ते.